5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 06:40 PM2024-02-06T18:40:16+5:302024-02-06T18:40:42+5:30

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

A latecomer to the 5G smartphone market, this company became the king; Some of the first companies... | 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

देशात फाईव्ह जी सुरु होऊन आता दीड वर्ष होत आले आहे. यामध्ये जिओ कंपनी आघाडीवर आहे. भारतात फाईव्ह जी येणार म्हणून त्याच्या आधीच दोन वर्षांपासून स्मार्टफोन आणण्यास सुरुवात केली होती. ज्यांनी सुरुवात केली त्या आता कुठे आहेत? आणि ज्यांनी नंतर आपले फोन आणले त्या कुठे आहेत... खरेतर ज्यांनी सुरवात केलेली त्या पहिल्या तीनमध्येही नाहीत. 

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. देशात सध्या ५जीची डिमांड वाढू लागली आहे. २०२३ मध्ये ५जीच्या स्मार्टफोनच्या मार्केट शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ १२२ टक्क्यांची आहे. 

यामुळे सारी गणितेच बदलून गेली आहे. 23 टक्के वाट्यासह सॅमसंग फाईव्ह जी फोनच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. तर व्हीवोने १५ टक्के वाटा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक वनप्लसचा आहे. हे जरा धक्का देणारे आहे. कारण वनप्लसचे फाईव्ह जी फोन हे २० हजारांपासून सुरु होतात. तर शाओमी, रेडमी, रिअलमी सारख्या कंपन्यांचे फाईव्ह जी स्मार्टफोन हे १२-१३ हजारांपासून सुरु होता. यात शाओमीचा पोको देखील ब्रँड आहे. परंतु एवढे स्वस्त फोन विकूनही या कंपन्या कुठेच दिसत नाहीएत. 

लोकांचा खरेदी पॅटर्न बदललाय?
फाईव्ह जी फोन घेताना लोकांचा ओढा हा २५ हजार रुपयांच्या रेंमकडे वळला आहे. या रेंजमध्ये दरवर्षागणिक ७१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ४जी फीटर फोन मार्केटमध्ये जिओमुळे ५ टक्क्यांची वाढ कायम आहे. २जी फोनच्या शिपमेंटमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे. 
 

Web Title: A latecomer to the 5G smartphone market, this company became the king; Some of the first companies...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.