नवी दिल्ली : ॲडोबने आपले फ्लॅश प्लेअर सॉफ्टवेअर ३१ डिसेंबर २०२० पासून बंद केले आहे. या फ्लॅश प्लेअरसाठी सपोर्ट समाप्त होण्याचा अर्थच असा आहे की, सर्व ब्राउजर्समधून हटविण्यात यावे. अर्थात, हे सॉफ्टवेअर १२ जानेवारी २०२१ पर्यंत ब्लॉक होणार नाही. मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे की, हे फ्लॅश प्लेयर बहुतांश विंडोज व्हर्जनमधून हटविण्यात आले आहे. फ्लॅश बेस्ड गेम्स आणि एनिमेशन्स ऑफर करणाऱ्या वेबसाइटवरूनही फ्लॅश प्लेयर हटविण्यात आलेआहे. ॲडोबने युजर्सना सांगितले आहे की, फ्लॅश प्लेयर अनइन्स्टॉल करा. १९९६ मध्ये लाँच झालेल्या ॲडोब फ्लॅश प्लेयरच्या मदतीने ॲनिमेशन बेस्ड कॉम्प्युटर गेम्स सहजपणे डाउनलोड न करता खेळता येत होते. आता स्मार्टफोन आणि नव्या टेक्नॉलॉजीवर शिफ्ट झाल्याने फ्लॅशची गरज राहिलेली नाही. ॲपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी फ्लॅशला सुरक्षेसंबंधी धोका समजून म्हटले होते की, आता हे आयफोन आणि आयपॅड्सवर काम करणार नाही. हे ॲप्लिकेशन वेगाने बॅटरी खर्च करते.
बाय बाय ॲडोब फ्लॅश प्लेयर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 5:27 AM