देशात जितक्या प्रमाणात नवे मोबाईल फोन्स खरेदी केले जातात. तितक्याच प्रमाणात जुने स्मार्टफोन्सही खरेदी केले जातात. OLX आणि Quikr सारख्या वेबसाईट्सवरूनही हे स्मार्टफोन्स निवडणं सोपं होतं. अनेकदा सेकंड हँड़ स्मार्टफोन्समुळे तुम्हाला समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. अनेक ठिकाणी ग्राहकांना चोरीचे स्मार्टफोन्सही विकण्यात येतात. यासाठी दिल्लीपोलिसांनी अशा कोणत्याही प्रकरणातून वाचण्यासाठी सल्ला दिला आहे.
दिल्लीपोलिसांनी सेकंड हँड स्मार्टफोन्सची खरेदी करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे. ज्यावेळी तुम्ही कोणतंही डिव्हाईस खरेदीकराल तेव्हा त्याचा IEMI नंबर नक्की व्हेरिफाय करा. तसंच IMEI नंबर तपासण्यासाठी पोलिसांनी Zipnet या वेबसाईटचा वापर केला आहे, "सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना सावध राहा. हे स्मार्टफोन चोरी किंवा कोणत्या गुन्ह्यातही वापरलेले असू शकतात. अशा फोन्सच्या आयएमईआयला दिल्ली पोलिसांच्या Zipnet या सिस्टमवर लिस्ट केलं जातं," असं पोलिसांनी सांगितलं.