मुंबई, दि. 19 - बहुतांश अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये CCleaner हे अॅप सर्रास पाहायला मिळतं. भारतात लोकप्रीय असलेलं हे अॅप स्मार्टफोनशिवाय कम्प्युटरवर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. पण जर तुम्हीही हे अॅप वापरत असाल तर तात्काळ हे अॅप Uninstall करा. कारण हे अॅप हॅक झालं आहे. हॅकर्सनी CCleaner ची सिक्युरिटी तोडून यामध्ये व्हायरस इंजेक्ट केला आहे. हा व्हायरस कोट्यवधी युजर्सच्या डिव्हाइसमध्ये पोहोचून नुकसान होण्याची शक्यता आहे. ब्रिटनची सिक्युरिटी कंपनी पिरिफॉर्मने CCleaner बाबत अलर्ट जारी केला आहे. पिरिफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, CCleaner वर व्हायरसचा अटॅक झाला आहे. या व्हायरसमुळे हे अॅप वापरणा-यांच्या डिव्हाइसला मोठं नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जवळपास 10 लाख युजर्स यामुळे प्रभावित झाल्याचंही बोललं जात आहे. टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार CCleaner च्या 5.33.6162 आणि CCleaner Cloud 1.07.3191 व्हर्जनवर व्हायरस अटॅक झाला आहे. CCleaner चा जवळपास 2 अब्जाहून अधिक युजर वापर करतात. मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे हॅकर्ससाठी ते सोपं लक्ष्य ठरलं असल्याचं बोललं जात आहे. हे विश्वासार्ह सॉप्टवेअर मानलं जातं, त्यामुळे CCleaner वर झालेला हा मॅलवेअर अटॅक धक्कादायक असल्याचं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे. हॅक झाल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंतच CCleaner चा वापर करता येणार असल्याची चर्चा आहे. 2 अब्ज डाऊनलोड-CCleaner सॉफ्यवेअर 2 अब्ज युजर्सनी आतापर्यंत डाऊनलोड केलं आहे. CCleaner चे मालकी हक्क असलेली कंपनी Avast ने दिलेल्या माहितीनुसार या व्हायरस अटॅकमध्ये 22 लाख युजर प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे. काय आहे CCleaner-CCleaner हे एक क्लिनिंग अॅप आहे. याद्वारे स्मार्टफोन आणि कम्प्युटरमधील अनावश्यक किंवा जंक फाइल क्लीन केल्या जातात. अॅंटी-व्हायरस म्हणूनही याचा वापर केला जातो. टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार CCleaner च्या 5.33.6162 आणि CCleaner Cloud 1.07.3191 व्हर्जनवर व्हायरस अटॅक झाला आहे.
अलर्ट! हॅक झालं CCleaner तात्काळ करा Uninstall, डॅमेज होईल डिव्हाइस
By सागर सिरसाट | Published: September 19, 2017 1:23 PM