सेल्फी तसेच अन्य प्रतिमांना पेंटिंगच्या विविध प्रकारांमध्ये परिवर्तीत करणारे प्रिझ्मा हे अॅप सध्या खूप लोकप्रिय ठरले आहे. याच प्रकारात मात्र थोड्या वेगळ्या पध्दतीत गुगलचे आर्टस् अँड कल्चर अॅप कार्य करणार आहे. यात कुणीही युजर सेल्फी काढून अपलोड करू शकतो. यानंतर या सेल्फीतील चेहरा गुगल आर्ट अँड कल्चर अॅपवर असणार्या जगभरातील विविध कलाकृतींपैकी नेमका कोणत्या कलाकृतीशी जुळतो? याचे पर्याय त्या युजरला देण्यात येतात. यातील योग्य पर्याय तो युजर निवडू शकतो. यात संबंधीत चेहरा नेमका किती टक्के मॅच होतो? याची माहितीदेखील देण्यात येते. ही तुलना करणारी प्रतिमा सोशल मीडियासह विविध माध्यमांमधून शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. गुगलचे हे अॅप आधीच लोकप्रिय असून यात या नवीन फिचरचा समावेश करण्यात आल्यामुळे ते आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.
आर्टस् अँड कल्चर अॅप यासाठी पॅटर्न रिकग्निशन आणि कृत्रीम बुध्दीमत्ता या प्रणालीचा वापर करत असते. ही सुविधा तशी अद्याप प्रायोगिक अवस्थेत असून लवकरच यात अजून अचूकता प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रिकोड या टेक पोर्टलने दिली आहे. दरम्यान, हे अद्ययावत अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपलचे अॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचे युजर्स याचा वापर करू शकतील.
गुगल आर्टस् अँड कल्चर अॅप हे आधीच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. यात जगभरातील आघाडीच्या तब्बल १२०० वस्तुसंग्रहालयांमधील माहिती देण्यात आलेली आहे. या संग्रहालयांमधील सर्व मौल्यवान कलाकृतींना कुणीही युजर अगदी घरबसल्या पाहू शकतो. यात अनेक संग्रहालयांचे ३६० अंशातील चित्रीकरणही देण्यात आले आहे हे विशेष.
डाऊनलोड लिंकअँड्रॉइड प्रणाली
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.cultural&hl=en
आयओएस प्रणाली
https://itunes.apple.com/in/app/google-arts-culture/id1050970557?mt=8