स्वस्त आणि नवीन iPhone SE (2022) घ्यावा कि त्याच किंमतीत iPhone 12 सीरिजचा मॉडेल निवडावा?
By सिद्धेश जाधव | Published: March 9, 2022 07:51 PM2022-03-09T19:51:10+5:302022-03-09T20:01:21+5:30
Apple iPhone SE (2022) vs iPhone 12 mini: सर्वात स्वस्त iPhone म्हणून कालच iPhone SE (2022) बाजारात आला आहे. परंतु स्वस्त असलेला हा फोन मस्त आहे का?
Apple नं आपल्या मार्च इव्हेंटमधून सर्वात स्वस्त iPhone SE (2022) फोन सादर केला आहे. याची खासियत म्हणजे कमी किंमतीत हा फोन फ्लॅगशिप लेव्हल A15 Bionic चिपला सपोर्ट करतो, जी iPhone 13 सीरिजमध्ये वापरण्यात आलेली कंपनीची पावरफुल मोबाईल चिप आहे. तसेच हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे.
भारतात iPhone SE (2022) च्या बेस व्हेरिएंटची किंमत 43,900 ठेवण्यात आली आहे, ज्यात 64GB स्टोरेज मिळते. हा फोन फर्स्ट टाइम युजर्ससाठी आला आहे असं कंपनीनं म्हटलं आहे. परंतु स्वस्त आहे म्हणून विकत घ्यावा कि त्याच किंमतीत दुसरा आयफोन घ्यावा, हे आपण आज पाहणार आहोत.
मॉडेल | Apple iPhone SE (2022) | Apple iPhone 12 Mini |
डिस्प्ले | 4.7-inch Retina HD | 5.4-inch OLED |
ओएस | iOS 15 | iOS 14 |
रियर कॅमेरा | 12MP सिंगल कॅमेरा | 12MP (वाईड), 12MP (अल्टरवाईड) |
फ्रंट कॅमेरा | 7MP | 12MP |
प्रोसेसर | Apple A15 Bionic | Apple A14 Bionic |
सिक्योरिटी | होम बटनमध्ये टच आयडी (फिंगरप्रिंट स्कॅनर) | फेस आयडी |
स्पेशल फीचर्स | 5G, IP67 रेटिंग | 5G, IP68 रेटिंग, मॅग सेफ |
किंमत | 43,900 रुपयांपासून सुरु | 49,999 रुपयांपासून सुरु (फ्लिपकार्टवर) |
डिजाईन
iPhone SE (2022) हा फोन डिजाईनवरून खूप जुना वाटतो कारण यात 2017 मध्ये आलेल्या iPhone 8 सारखी डिजाईन मिळते. सध्या मोठी चिन, हेड आणि बेजेल असलेले फोन जुनाट वाटतात. कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर देखील iPhone 12 mini आणि iPhone 13 mini मध्ये मिळतो, जे मोठी स्क्रीन आणि नवीन डिजाइन देखील देतात.
स्पेक्स
iPhone 12 mini फक्त चिपसेटच्या बाबतीत मागे पडतो. iPhone SE मध्ये 7MP चा सेल्फी कॅमेरा आहे तर 12 मिनीमध्ये 12MP चा सेल्फी शुटर मिळतो. एसई च्या मागे 12MP चा सिंगल सेन्सर मिळतो, तर 12 मिनी 12MP च्या ड्युअल रियर कॅमेऱ्यासह आला आहे. ज्यातील एक अल्ट्राव्हाईड सेन्सर आहे. iPhone SE मध्ये IP67 रेटिंग मिळते तर iPhone 12 mini मध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे. SE मध्ये 4.7-इंचाची Retina स्क्रीन आहे, तर iPhone 12 mini मध्ये 5.4-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले मिळतो.
किंमत
ज्यांना स्वस्त आयफोन हवा त्यांच्यासाठी iPhone 12 mini चा देखील पर्याय उपलब्ध आहे. iPhone SE (2022) ची आरंभिक किंमत 43,900 रुपये आहे, तर Flipkart आणि Amazon वरून iPhone 12 mini सध्या 49,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करून ही किंमत नव्या आयफोन एसई इतकी करता येईल.