वाढत्या प्रदूषणासोबत दोन हात करण्यासाठी चीनने जगातलं सर्वात मोठं एअर प्युरिफायर तयार केलं आहे. १०० मीटर लांब उंच या प्यूरिफायरने प्रदूषणामुळे खराब होणारी हवा स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. हे प्यूरिफायर चीनच्या शांक्शी प्रांतातील झियान शहरात एका टॉवरवर लावण्यात आलं आहे.
चीनच्या इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ एन्वायर्नमेंटच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, या टॉवरने शहराच्या १० किमी क्षेत्रातील हवा स्वच्छ करण्यास मदत मिळेल. याचा अर्थ हा की, याने पूर्ण शहरातील हवा स्वच्छ करण्यासोबतच शहराच्या आजूबाजूच्या परिसरातीलही हवा स्वच्छ होईल. या प्यूरिफायरने रोज १ कोटी घनमीटर हवा स्वच्छ केली जाते. इतकेच नाही तर हे प्यूरिफायर हवा स्वच्छ करण्यासोबतच स्मॉगही १५ ते २० टक्के कमी करते.
एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये स्मॉगमुळे १.८ मिलियनपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहे. इंस्टिट्यूट इकोनॉमिक्स अॅंड फाइनॅंशिअल अॅनालिसिसनुसार, चीनने क्लीन एनर्जी प्रोजेक्टवर २००५ मध्ये ७.५ अरब डॉलर तर २०१५ मध्ये १०१ अरब डॉलरची गुंतवणूक केली आहे. सध्या दिल्लीसह देशातील आणखीही काही शहरांमध्ये प्रदूषणाचा विळखा वाढला आहे. प्रदूषणावर जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट धक्कादायक आहे. WHOच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी विषारी हवेमुळे भारतात जवळपास १ लाख मुलांचा मृत्यू झाला होता. तर दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे दरवर्षी साधारण ३० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो.