नवी दिल्ली- सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली भारत संचार निगम लिमिटेड(BSNL)नं नव्या प्लानची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे शौकीन आहेत, त्यांना या नव्या प्लाननुसार धमाकेदार सुविधा मिळणार आहे. बीएसएनएलनं 199 रुपये/ 201 रुपये आणि 499 रुपये, असे दोन प्लान लाँच केले आहेत. कंपनीनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. या प्लाननुसार आपल्याला आयपीएल सामन्यांचे ताजे अपडेट मिळणार आहेत. दोन्ही प्लानमध्ये सामन्यांचा स्कोअर बोर्ड समजणार आहे. तसेच या प्लानमध्ये आपल्याला स्वतःच्या फोनमध्ये रिंग बॅक टोन सर्व्हिसही मिळणार आहे. परंतु या सेवेचा वापर करण्यासाठी आपल्याला बीएसएनएल अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. याशिवाय या दोन्ही प्लानमध्ये सामन्याची माहिती SMS अलर्टच्या माध्यमातून प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी मिळणार आहे. यात कॉल आणि डेटाची सुविधाही मिळते. BSNL STV 199/201 या प्लानमध्ये BSNLच्या ग्राहकाला अमर्यादित वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. ही सुविधा लोकल आणि एसटीडी दोन्ही नंबरवर मिळते. तसेच या प्लानमध्ये ग्राहकाला दररोज 1 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांपर्यंत राहणार आहे. BSNLच्या ट्विटनुसार हा प्लान उत्तर भारतात 201 रुपयांना मिळतो, तर इतर ठिकाणी हा प्लान 199मध्ये उपलब्ध आहे.
BSNLनं जारी केला नवा प्लान, IPLच्या फॉलोअर्सना मिळणार धमाकेदार सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 1:15 PM