सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नव्या ऑफर अंतर्गत ग्राहक वर्क फ्रॉम होम ब्रॉडबँडअंतर्गत कंपनीचा प्लॅन विनामूल्य वापरू शकतात. यात युजर्सला 10 MBPSसह दररोज हाय स्पीड 5 जीबी डेटा मिळेल. कंपनीने म्हटले आहे की, ही ऑफर केवळ बीएसएनएलच्या लँडलाइन वापरकर्त्यांसाठी आहे, जे सध्या विनामूल्य ब्रॉडबँड कनेक्शनचा लाभ घेण्यास सक्षम असतील. कंपनीला आपल्या लँडलाइन वापरकर्त्यांचे ब्रँड प्लॅनमध्ये स्थलांतर करायचे आहे.8 डिसेंबरपर्यंत ऑफर वैधबीएसएनएलने मार्चमध्येच ही योजना सुरू केली. सुरुवातीला त्याची वैधता 19 एप्रिलपर्यंत होती, जी अनेक वेळा वाढविण्यात आली. आता ही ऑफर 8 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑफर अंतर्गत बीएसएनएल लँडलाइन वापरकर्त्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता मूलभूत ब्रॉडबँड कनेक्शन दिले जाईल. 8 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून कोणताही इंस्टॉलेशन चार्ज आकारला जात नाही. यात वापरकर्त्यांना 10 MBPSच्या वेगासह दररोज 5 जीबी डेटा देण्यात येणार आहे. मर्यादा संपल्यानंतर वेग 1 एमबीपीएसपर्यंत कमी होईल. ज्या लँडलाइन वापरकर्त्यांकडे कोणतेही सक्रिय ब्रॉडबँड कनेक्शन नाही ते ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम असतील. वापरकर्त्यांना ही सुविधा केवळ 30 दिवसांसाठी विनामूल्य देण्यात येईल.सर्व सर्कलमध्ये लागूकंपनीची ही ऑफर अंदमान-निकोबार सर्कल वगळता सर्वच सर्कलमध्ये उपलब्ध आहे. बीएसएनएल लँडलाइन ग्राहक टोल फ्री क्रमांक 1800-345-1504 वर कॉल करून ही नवीन ब्रॉडबँड योजना मिळवू शकतात.
BSNL ग्राहकांना मोठं गिफ्ट, दररोज मोफत मिळणार 5 जीबी डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 9:34 AM