सावधान स्वस्त स्मार्टफोन व टॅबलेटमध्ये असतात अ‍ॅडवेअर्स

By शेखर पाटील | Published: May 29, 2018 02:45 PM2018-05-29T14:45:17+5:302018-05-29T14:45:17+5:30

स्वस्त मूल्यात मिळणारे काही स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये धोकादायक अ‍ॅडवेअर्स असल्याचा धक्कदायक दावा अव्हास्त या सायबर सिक्युरिटीतील आघाडीच्या कंपनीने केला आहे.

Careful among the cheap smartphones and tablets adwares | सावधान स्वस्त स्मार्टफोन व टॅबलेटमध्ये असतात अ‍ॅडवेअर्स

सावधान स्वस्त स्मार्टफोन व टॅबलेटमध्ये असतात अ‍ॅडवेअर्स

googlenewsNext

स्वस्त मूल्यात मिळणारे काही स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये धोकादायक अ‍ॅडवेअर्स असल्याचा धक्कदायक दावा अव्हास्त या सायबर सिक्युरिटीतील आघाडीच्या कंपनीने केला आहे.

अव्हास्त या कंपनीने एका ब्लॉग पोस्टच्या (https://blog.avast.com/android-devices-ship-with-pre-installed-malware) माध्यमातून जगभरातील विविध स्मार्टफोन्स आणि टॅबलेटच्या मॉडेल्सवर केलेल्या सखोल अध्ययनाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. यात सर्वात धक्कदायक बाब म्हणजे बर्‍याच मॉडेल्समध्ये ‘कोसीलून’ हे अ‍ॅडवेअर्स हे प्रिलोडेड अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सुमारे १४० कंपन्यांनी तयार केलेल्या स्मार्टफोन्स आणि टॅबलेटचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात अर्कोज, झेडटीई आणि मायफोन या ख्यातप्राप्त कंपन्यांच्याही काही मॉडेल्सचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यातील बहुतांश मॉडेल्स हे गुगलने प्रमाणित केलेले नाहीत.

अव्हास्तने केलेल्या संशोधनातून बहुतांश स्वस्त मूल्यातल्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये अ‍ॅडवेअर्स हे प्रिलोडेड अवस्थेत असतात. यामुळे युजर स्मार्टफोनवरून इंटरनेट सर्फींग करत असतांना त्याच्या ब्राऊजरमध्ये वारंवार जाहिरातींचा भडिमार होत असतो. भारतासह जगातल्या १०० देशांमधील तब्बल १८००० विविध स्मार्टफोन आणि स्मार्टफोनच्या मॉडेल्समध्ये या प्रकारच्या अ‍ॅडवेअर्सचा प्रादूर्भाव असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तर काही मॉडेल्समध्ये याच्या जोडीला अत्यंत धोकेदायक अशा मालवेअर्सचाही समावेश असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही मिळून युजर्सची गोपनीय माहिती चोरत असल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, अव्हास्त कंपनीच्या या गौप्यस्फोटानंतर गुगलने पुढाकार घेत काही संशयास्पद अ‍ॅप्लीकेशन्सला गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे अ‍ॅडवेअर्स सुमारे तीन वर्षांपासून कार्यरत असून त्याचा पूर्णपणे नायनाट करणे अशक्य असल्याचेही अव्हास्तने नमूद केले आहे.

Web Title: Careful among the cheap smartphones and tablets adwares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.