मुंबई : आज 14 नोव्हेंबर अर्थात बालदिन. देशभरात आज मोठ्या उत्साहत बालदिन साजरा होत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीला बालदिन साजरा केला जातो.
गुगल इंडिया नेहमीच एक खास डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करताना दिसते. यावेळीही गुगल इंडियानेही आकर्षक डूडल बनवून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकले आहे.
गुगल इंडियाने बालदिन साजरा करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही बालदिनाआधी Doodle 4 Google स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची थीम 'When I grow up, I hope..' अशी होती. या स्पर्धेत जी मुले भाग घेतात. त्यापैकी एका मुलाचे निवडलेले पेंटिंग गुगलकडून आपले डुडल म्हणून तयार करण्यात येते. यावेळी स्पर्धेत भाग घेतलेल्या गुरुग्राममधील दिव्यांशी सिंघल हिच्या पेंटिंगवरून गुगल डुडल करण्यात आले आहे.
दरम्यान, 14 नोव्हेंबर 1889 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरु यांची ‘चाचा नेहरु’ म्हणून ओळखले जायचे. पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलेही खूप आवडत होती. मुलांप्रती त्यांचे प्रेम लक्षात घेऊन, पंडित जवाहरलाल यांच्या स्मरणार्थ आणि त्यांचा जन्मदिवसानिमित्त हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.