डी-लिंकचा मिनी वाय-फाय कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 01:11 PM2018-05-08T13:11:17+5:302018-05-08T13:11:17+5:30
डी-लिंक या कंपनीने वाय-फाय नेटवर्क सपोर्ट असणारा डीसीएस-पी६०००एलएच हा एचडी कॅमेरा बाजारपेठेत सादर केला आहे.
डी-लिंक या कंपनीने वाय-फाय नेटवर्क सपोर्ट असणारा डीसीएस-पी६०००एलएच हा एचडी कॅमेरा बाजारपेठेत सादर केला आहे.अलीकडच्या कालखंडात वाय-फाय नेटवर्क सपोर्टने सज्ज असणारे कॅमेरे बाजारपेठेत दाखल होत आहेत. डी-लिंक कंपनीने सादर केलेला डीसीएस-पी६०००एलएच हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. याला कंपनीच्या माडीलिंक क्लाऊड सेवेचा सपोर्ट दिलेला आहे. याच्या मदतीने या कॅमेर्यातील चित्रीकरण हे २४ तास या क्लाऊड सेवेवर रेकॉर्ड होत असते. याचा अॅटोमॅटीक बॅकअप घेतला जातो. या डाऊनलोड केलेल्या बॅकअपला केव्हाही स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याचा स्मार्टफोनवर रिअल टाईम प्रिव्ह्यूदेखील पाहता येतो. यामध्ये इन्फ्रारेड एलईडी इनबिल्ट अवस्थेत प्रदान रण्यात आले आहेत. याच्या मदतीने सुमारे पाच मीटर अंतरावरील गडद अंधारातील छायाचित्रीकरणही स्पष्टपणे पाहता येणार आहे.
डी-लिंक मिनी एचडी वाय-फाय कॅमेर्याच्या मदतीने एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेच्या चित्रीकरणाचे रेकॉर्डींग करता येणार आहे. हे चित्रीकरण १२० अंशातील वाईड अँगल व्ह्यू या प्रकारातील असून यामध्ये ४ एक्स झूमदेखील करता येणार आहे. यामध्ये इनबिल्ट सेन्सर दिलेले असून याच्या मदतीने संबंधीत कॅमेर्याच्या परिसरात काही हालचाल झाल्यास युजरला आपल्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन मिळणार आहे. या सुविधेसाठी अँड्रॉइड व आयओएस अॅप सादर करण्यात आले आहे. वाय-फायसोबत यामध्ये ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटीदेखील देण्यात आली आहे. या कॅमेर्याचे मूल्य २,९९५ रूपये असून हे मॉडेल डी-लिंक कंपनीच्या संकेतस्थळासह देशभरातील मोजक्या शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.