Realme टेकलाइफ सब-ब्रँड Dizo च्या माध्यमातून Dizo Watch 2 Sports भारतात लाँच झालं आहे. हे घड्याळ जुन्या डिजो वॉच 2 चं अपग्रेड व्हर्जन आहे. नवीन मॉडेलमध्ये वॉटर रेजिस्टन्स, 10 दिवसांचा बॅकअप, 110 स्पोर्ट्स मोड आणि SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. कंपनीनं Dizo Watch 2 Sports ची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत येत्या 8 मार्चपासून काही काळ हे वॉच 1,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
Dizo Watch 2 Sports चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिजो वॉच 2 स्पोर्ट्स वॉच 240x280 पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या 1.69-इंचाचा टीएफटी टच डिस्प्लेसह बाजारात आलं आहे. यात 600 निट्स पीक ब्राईटनेस आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग मिळते. यातील 150 पेक्षा जास्त वॉच फेस कस्टमाइजेशनमध्ये मदत करतात. जुन्या स्मार्टवॉचच्या तुलनेत या वॉचचं वजन कमी आहे.
डिजो वॉच 2 स्पोर्ट्समध्ये 110 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत. अन्य हेल्थ मॉनिटरिंग फीचर्समध्ये रियल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड-ऑक्सीजन सॅचुरेशन (SpO2) मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, मेन्यूस्ट्रल पीरियड ट्रॅकिंग, स्टेप काउंटर, कॅलरी ट्रॅकर, वॉटर ड्रिंकिंग रिमायंडर आणि सेडेंटरी रिमायंडरचा समावेश करण्यात आला आहे. यातील 260mAh ची बॅटरी स्मार्ट पावर-सेव्हिंग चिपच्या मदतीनं 10 दिवसांचा बॅकअप देते.
कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5 10 मीटर रेंजसह देण्यात आलं आहे. तसेच म्यूजिक प्लेबॅक कंट्रोल, रिमोट कॅमेरा शटर, स्मार्ट नोटिफिकेशन, कॉल रिजेक्शन फीचर, अलार्म आणि फाईंड माय फोन, असे फिचर देखील आहेत. यात 5ATM (50 मीटर) वॉटर-रेजिस्टन्स रेटिंग मिळते.
हे देखील वाचा: