आधार कार्ड (Aadhaar Card) आपल्याकडे महत्वाचे कागदपत्र झाले आहे. कोणत्याही कामासाठी आता आधारकार्ड गरजेचे आहे. कोणतेही सरकारी काम करून घेण्यापूर्वी, ओळखपत्रासाठी देखील ते खूप महत्वाचे आहे. जर तुम्हीही आधार कार्ड सर्व ठिकाणी वापरत असाल तर आपल्याला कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. आता तुम्हाला आधार कार्ड जवळ बाळगण्याची गरज नाही.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला कधीही आधार कार्ड सोबत घ्यावे लागणार नाही. तुम्ही तुमचे आधारकार्ड ऑनलाइन कुठेही डाउनलोड करू शकता. अनेकांना आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया माहित नाही.
आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला अगोदर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर कॅप्चा टाकावा लागेल. सर्व काही टाकल्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल.
सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्हाला शेवटी OTP टाकावा लागेल. तुम्ही ओटीपी टाकताच तुमच्यासमोर आधार कार्ड दिसेल. तुम्ही ते कुठेही वापरू शकता. हे पूर्णपणे वैध आहे आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे मूळ आधार कार्ड हरवण्याचे कोणतेही टेंशन नाही.