भारीच! आता लवकरच मतदान कार्डही आधारप्रमाणे होणार डिजिटल; करता येणार डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:39 PM2020-12-12T15:39:08+5:302020-12-12T15:39:40+5:30

Election Commission Digital Voter Cards : मतदान कार्ड मिळण्यासाठी लागणारा उशीर आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार

election commission now voter cards will also digital and able to download like aadhaar cards | भारीच! आता लवकरच मतदान कार्डही आधारप्रमाणे होणार डिजिटल; करता येणार डाऊनलोड

भारीच! आता लवकरच मतदान कार्डही आधारप्रमाणे होणार डिजिटल; करता येणार डाऊनलोड

googlenewsNext

नवी दिल्ली - निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच मतदान कार्ड हे डिजिटल स्वरुपात ( Digital Voter Cards) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मतदान कार्ड (Voting Card) आता आधार कार्डप्रमाणे डिजिटल स्वरुपात जवळ ठेवता येणार आहे. सध्याच्या मतदान कार्डहोल्डर्सना हेल्पलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून केवायसी (KYC) केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होईल. निवडणूक आयोगाचा मतदारांना 'इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड' (EPIC) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणं हा हेतू आहे.

निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, नवीन मतदार इंटरनेटवरून आपलं मतदान कार्ड डाऊनलोड करू शकणार आहेत. तसेच या डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. याशिवाय मतदान कार्ड मिळण्यासाठी लागणारा उशीर आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये असलेल्या मतदारांनाही याचा फायदा होणार आहे. या निर्णयानंतर मतदार डिजिटल स्वरूपात EPIC डाऊनलोड करू शकणार आहेत.

आयोगाच्या निर्णयानंतर रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असलेले परदेशी मतदार (Overseas Voters) देखील डिजिटल मतदार कार्ड सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. मात्र परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाची सुविधा देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परदेशी भारतीयांनाही मतदान कार्ड दिले जात नाही. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर परदेशी मतदारांनाही त्यांचे EPIC म्हणजेच डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड

डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड (QR) असतील. या कोडमधील माहितीच्या आधारे, इंटरनेटवरून डाऊनलोड केलेल्या मतदान कार्डद्वारे मतदार मतदान करू शकतील. यामध्ये, क्यूआर कोडमध्ये मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग आणि मतदारांच्या फोटोशी संबंधित माहिती असणार आहे. त्याच वेळी दुसर्‍या क्यूआर कोडमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक वगळता मतदाराचा पत्ता असेल. निवडणूक आयोग यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: election commission now voter cards will also digital and able to download like aadhaar cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.