टु-जी आणि थ्री-जी नेटवर्कवरील तुलनेत संथ असणार्या इंटरनेटच्या युजर्ससाठी अनेक कंपन्यांनी आपापल्या स्मार्टफोन अॅप्लीकेशन्सच्या लाईट आवृत्त्या सादर केल्या आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझीलसारख्या देशातील युजर्सला हे सादर करण्यात आले आहेत. या प्रकारातील अॅप हे आकारमानाने कमी असते. तसेच ते इंटरनेटचा वेग संथ असतांनाही सहजगत्या चालू शकते. आजवर गुगल, फेसबुक, ट्विटर आदींसह अन्य कंपन्यांनी आपल्या विविध लोकप्रिय अॅप्सचे लाईट व्हर्जन्स सादर केले आहेत. यात आता अमेझॉन कंपनीच्या किंडल लाईट अॅपची भर पडणार आहे. अर्थात हे मूळ अॅपपेक्षा आकारमानाने खूप कमी म्हणजे फक्त २ मेगाबाईट आकाराचे आहे. अर्थात ते सहजगत्या इन्स्टॉल होऊ शकते. तसेच ते खूप वेगवानही आहे. विशेष बाब म्हणजे यात मूळ अॅपमधील बहुतांश फंक्शन्स उपलब्ध आहेत.
किंडल लाईट अॅपवर सुमारे पाच दशलक्ष पुस्तकांचा खजिना असून यात इंग्रजीसह हिंदी, मराठी, तामिळ व गुजराती या भारतीय भाषांमधील पुस्तकांचाही समावेश आहे. यावरून कुणीही ई-बुक्स खरेदी करू शकून याला वाचू शकणार आहे. यात इमेज झूमसह फाँट साईज अॅडजस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यात डार्क मोडदेखील दिलेला आहे. यात सुलभ नेव्हिगेशन सिस्टीमही देण्यात आली आहे. यात मूळ अॅपमधील काही महत्वाचे फिचर्स नसले तरी बेसिक पध्दतीने ई-बुक्सचा आनंद घेता येणार आहे. हे अॅप खास भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड युजर्ससाठी ते उपलब्ध करण्यात आले आहे.
डाऊनलोड लिंक:-
अमेझॉन किंडल लाईट अॅप
https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.klite&hl=en