लवकरच बदलू शकतं Facebook चं नाव! जाणून घ्या, कंपनी का घेतेय एवढा मोठा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:12 AM2021-10-20T11:12:38+5:302021-10-20T11:13:44+5:30
केवळ सोशल मीडिया प्लॅटफार्मपुरतीच ओळख राहू नये, यासाठी, असा निर्णय घेण्याची कंपनीची इच्छा आहे.
Facebook Inc, कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याच्या विचारात आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती असलेल्या सूत्राचा हवाला देत द व्हर्जने म्हटले आहे, की फेसबूक पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचे नाव बदलण्याची योजना आखत आहे. सीईओ मार्क झुकरबर्ग (Zuckerberg) 28 ऑक्टोबरला होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यासंदर्भात बोलण्याची योजना आखत आहेत. (Facebook plans to rebrand under new name)
संबंधित वृत्तानुसार, केवळ सोशल मीडिया प्लॅटफार्मपुरतीच ओळख राहू नये, यासाठी, असा निर्णय घेण्याची कंपनीची इच्छा आहे. मात्र यासंदर्भात, कंपनी अफवा आणि अंदाजांवर प्रतिक्रिया देत नाही, असे म्हणत फेसबुकच्या एका प्रवक्त्याने यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आहे.
फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांनी जुलै महिन्यात एका Earning कॉलमध्ये म्हटले होते, की कंपनीचे भविष्य 'Metaverse' मध्ये आहे. फेसबुक जे लक्ष्य निर्धारित करत आहे, ती एका अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी आहे. जी एका संस्थेअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑकुलस आणि मेसेंजर सारख्या अनेक सोशल नेटवर्किंग अॅप्सपैकी एक आहे.
10 हजार जणांना नोकरीची संधी देणार -
Facebook 18 ऑक्टोबरला म्हटले आहे, की इंटरनेटच्या वर्चुअल रिअॅलिटी व्हर्जन Metaverse बनवण्यासाठी यूरोपियन यूनियन देशांमध्ये 10 हजार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. फेसबुक या डिजिटल वर्ल्डलाच येणारं भविष्य मानत आहे. मेटावर्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर वास्तविक आणि आभासी जगामधील अंतर कमी होईल, असे कंपनीचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.