फुजीफिल्मचा नवीन मिररलेस कॅमेरा

By शेखर पाटील | Published: May 29, 2018 11:55 AM2018-05-29T11:55:47+5:302018-05-29T11:55:47+5:30

फुजीफिल्म कंपनीने एक्स-टी१०० हा मिररलेस कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

Fujifilm's new Mirrorless Camera | फुजीफिल्मचा नवीन मिररलेस कॅमेरा

फुजीफिल्मचा नवीन मिररलेस कॅमेरा

googlenewsNext

 फुजीफिल्म एक्स-टी१०० हे मॉडेल मिररलेस इंटरचेंजेबल लेन्स या प्रकारातील असून यामध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २४ मेगापिक्सल्स क्षमतेचे एपीएस-सी सीएमओएस या प्रकारातील सेन्सर प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये ९१ पॉइंटरवर आधारित फेज डिटेक्शन ऑटो-फोकस म्हणजेच पीडीएएफ प्रणाली दिलेली आहे. यातील आयएसओ रेंज ही २००-१२८०० असून ती १००-५१२०० पर्यंत विस्तारीत करणे शक्य आहे. या कॅमेरा ३ इंच आकारमानाचा टचस्क्रीन एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला असून हा डिस्प्ले तीन प्रकारांमध्ये वळवून वापरण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. अर्थात याच्या मदतीने सेल्फीसमान प्रतिमा सहजपणे घेता येणार आहेत. तसेच यातील इलेक्टॉनिक व्ह्यू फाईंडर हा अतिशय दर्जेदार असा आहे.

फुजीफिल्म एक्स-टी१०० या मॉडेलमध्ये १५ फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के अर्थात ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तसेच यात ६० फ्रेम्स प्रति-सेकंदाच्या गतीने फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तर यात सुपर स्लो-मोशनमधील चित्रीकरणदेखील करता येणार आहे. यात ब्ल्यु-टुथ व वाय-फाय कनेक्टीव्हिटी देण्यात आली आहे. यामुळे याला स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनदेखील विकसित करण्यात आले आहे. याशिवाय यात युएसबी, मायक्रो-युएसबी, एचडीएमआय आदी पर्यायदेखील असतील. यातील बॅटरी दर्जेदार असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ४३० प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. पहिल्यांदा हे मॉडेल अमेरिका व कॅनडामध्ये मिळणार असून लवकरच याला भारतात लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. याचे भारतातील मूल्य ४० ते ५० हजारांच्या दरम्यान असू शकते.
 

Web Title: Fujifilm's new Mirrorless Camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.