Google Doodle: सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सची निर्मिती करणाऱ्या Otto Wichterle गुगल डुडलद्वारे अभिवादन
By सिद्धेश जाधव | Published: October 27, 2021 11:37 AM2021-10-27T11:37:18+5:302021-10-27T11:37:34+5:30
Otto Wichterle Contact Lenses: Google ने आज Doodle च्या माध्यमातून चेक केमिस्ट Otto Wichterle यांना मानवंदना दिली आहे. त्यांनी सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सची निर्मिती केली होती.
गुगलने आज आपल्या होम पेजवरील Doodle मधून चेक रिपब्लिकचे केमिस्ट Otto Wichterle यांना मानवंदना दिली आहे. त्यांनी आधुनिक सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचा शोध लावला होता. आज Otto Wichterle यांची आज 108वी जयंती आहे, त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1913 रोजी झाला होता. ते स्वतः चष्मा वापरत होते आणि त्यांनी त्यावर उपाय म्हणून आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्ससहा शोध लावला.
ओटो यांना अगदी सुरवातीपासून विज्ञानाची आवड होती. त्यांनी 1936 मध्ये प्राग इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मधून जैविक रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती. 1950 मध्ये त्यांनी डोळ्यांच्या प्रत्यारोपणसाठी एक पाणी शोषून घेणाऱ्या आणि पारदर्शी जेलचा शोध घेत होते, त्यातून आधुनिक कॉन्टेक्ट लेन्सची निर्मिती झाली.
आज त्यांची जयंती आहे त्यामुळे गुगलने त्यांना होम पेजवरील डुडलमधून मानवंदना दिली आहे. या डूडलमध्ये ओटो विक्टरले एका प्रयोगशाळेत दिसत आहेत. त्यांच्या हातात कॉन्टेक्ट लेन्स दिसत आहे. तसेच त्यांच्या मागे असलेल्या Google च्या नावातील O डोळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स म्हणून दाखवण्यात आले आहेत.
ओटो विक्टरले यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1913 रोजी चेक रिपब्लिकमधील प्रोस्टेजोव येथे झाला होता. त्यांनी Wolker Grammar School इथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1936 मध्ये प्राग इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मधून जैविक रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळवली आणि तिथेच त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील काम केले. सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्ससह ते स्मार्ट बायोमटेरियल्सचे जनक म्हणून देखील ओळखले जातात.