जगाला एका बोटावर काही सेकंदांच्या आत सारी माहिती देणाऱ्या गुगलकडून (Google) चुकून एक मोठी चूक झाली आहे. मार्केटिंगच्या एका ईमेलमध्ये कंपनीकडून नव्या येणाऱ्या Pixel Buds A ची इमेज आणि माहिती लीक झाली आहे. यामुळे करायला गेले एक आणि घडे भलतेच याचा अनुभव सध्या गुगलच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. (Google accidentally leaks Pixel Buds A in marketing email ahead of launch )
झाले असे की, गुगल नेस्ट उत्पादने वापरणाऱ्या किंवा वापरू इच्छिणाऱ्या युजरना ते कसे वापरावेत याची माहिती देणारा ईमेल पाठविण्यात आला होता. यासाठी त्या युजरनी रजिस्ट्रेशन केले होते. नेस्ट उत्पादने नुकतीच लाँच करण्यात आली आहेत. मात्र, या मेलच्या खाली Pixel Buds A ची माहिती गेल्याने खळबळ उडाली. कारण हा बड्स अद्याप लाँच व्हायचा आहे. गुगल पिक्सल 5a 5G आणि Pixel 6 सोबच हा बड्स लाँच करणार असल्याची चर्चा आहे.
9to5 Google च्या रिपोर्टनुसार गुगलने चुकून Pixel Buds A चा फोटो लीक केला आहे. हा फोटो डार्क ग्रीन रंगातील बड्सचा आहे. “your Nest device just got an upgrade” , असे या मेलचे शीर्षक होते. गुगलला नेस्ट ग्राहकांना त्यांच्या नवीन अपग्रेडबाबत माहिती द्यायची होती. यासाठी हा मेल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच नेस्ट हब हे फिचर देण्यात आले आहे.
ही माहिती सोडून अनेक ग्राहकांचे लक्ष त्या छोट्याशा बड्सच्या इमेजवर गेले. या बड्सची चार्जिंग केस ही पांढऱ्या रंगात आहे. या आधी देखील या बड्सचा फोटो लीक झाला होता. मात्र, आता गुगलकडूनच लीक झाल्याने व दोन्ही फोटो मिळतेजुळते असल्याने हेच ते बड्स असल्याचे नक्की झाले आहे.
गुगलकडून Dysonics स्टार्टअपची खरेदीPixel Buds A साठी गुगलने Dysonics स्टार्टअपची खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. विमानातील मनोरंजनाची यंत्रणा ही स्टार्टअप तयार करते. या कंपनीने Pixel Buds A थ्रीडी साऊंडची प्रणाली दिल्याची शक्यता आहे. गुगलचे हे बड्स अॅपलच्या AirPods Pro पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे.