डिजिटल वॉलेटसाठी भारतीयांचा Google Pay कडे जास्त ओढा आहे. फोन पे ने या अॅपला मागे टाकलेले असताना गुगुल पेद्वारे अनेकदा दुकानदाराला, कोणाला पैसे पाठवायचे असतील तर लगेचच पाठविले जात आहेत. परंतू या गुगल पे अॅपमध्ये मोठा बदल झाला आहे. अनेकांना गेल्या काही दिवसांपासून गुगल पे मोबाईलमध्ये शोधूनही सापडत नाहीय. (google pay logo and name changed second time in India.)
गुगल पेचा सुरुवातीपासूनचा लोगो बदलण्यात आला आहे. नवीन अपडेटमध्ये हा बदल झाला आहे. काहींच्या मोबाईलवर अद्यापही जुने गुगल पे दिसत आहे. प्ले स्टोअरवरही त्यांना अपडेट आलेली नाही. मात्र, ज्यांना ही अपडेट आलीय त्यांना लोगो बदलाबरोबरच नावातही बदल झाल्याने मोबाईलमध्ये गुगल पे सुरुवातीला सापडत नाहीय.
गुगुल पेच्या नावात दुसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. हे दुसरे नाव Gpay असे ठेवण्यात आले आहे. यामुळे सवयीप्रमाणे Google Pay शोधायला गेल्यास आता जुने गुगल पे दिसत नसल्याने चुकून अनइन्स्टॉल झाले की काय असा समज होण्याची शक्यता आहे. यामुळे जर Google Pay सापडत नसेल तर सर्चमध्ये Gpay टाईप करावे, जेणेकरून तुम्हाला गुगल पेने पेमेंट करता येणार आहे.
मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय
नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार होता. गुगल पेच्या नवीन लोगोमध्ये U आणि N इंटरलॉक केला आहे. हा लोगो 3D वाटतो. वेगवेगळी रंगसंगती यामध्ये वापरण्यात आली आहे. या नव्या लोगोत लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे.
Barcode Scanner App मध्ये आला व्हायरस, गुगलने प्ले स्टोरवरून हटवलं; फोनमधून लगेचच करा डिलीट
2017 पासून दुसरा मोठा बदलGoogle Pay हे अॅप भारतात तेझ या नावाने 18 सप्टेंबर 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने नाव बदलून ते Google Pay केले होते. यामुळे आधी एवढे लोकप्रिय न झालेले अॅप हळूहळू भारतीयांच्या मोबाईलमध्ये दिसू लागले. गुगलचा जी आणि पे अशी अक्षरे असलेला लोगो आहे. यामुळे सध्यातरी हे अॅप सहज ओळखता येते. मोबाईलमध्ये भारंभार अॅप इन्स्टॉल असतात. त्यातून नेमके गुगल पे अॅप शोधून काढणे सध्यातरी सोपे आहे. परंतू आता नवीन लोगो आल्यास मात्र, फसायला होण्याची मोठी शक्यता आहे. कारण यावर कुठेही गुगलचा जी किंवा पे लिहिलेले नाही. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट अॅप बनले आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वरही काही लोकांनी google pay चा नवा लोगो ट्विट केला आहे.