मुंबई, दि. 28 - गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले आहेत. युझर्सचे ई-मेल, टेक्स्ट मेसेज, व्हॉइस कॉल्स, लोकेशन आदी गोष्टींवर हे अॅप्स नजर ठेवून असायचे त्यामुळे ते डिलीट करण्यात आल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. या 20 अॅप्सचे डेव्हलपर्स आणि अॅप्सला अॅन्ड्रॉइड ईकोससिस्टीमद्वारे ब्लॉक करण्यात आलं आहे. या अॅप्समध्ये लिपिज्जा नावाचा एक स्पायवेअर होता. हा स्पायवेअर जुनं अॅंड्रॉइड व्हर्जन असलेल्या फोनचं सिक्युरिटी प्रोटेक्शन तोडायचा. त्यानंतर युझर्सची खासगी व संवेदनशील माहिती गोळा केली जायची. हे अॅप्स जीमेल, हॅंगआउट, मेसेंजर यासारख्या अॅप्समधून माहिती गोळा करत होते. याशिवाय व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि व्हायबर यासारख्या अॅप्सच्या मेसेजवरही लक्ष ठेवलं जायचं. सुरूवातीला गुगलने असे अॅप्स ब्लॉक केले होते, मात्र थोड्याच दिवसांनंतर काहीसा बदल करून हे अॅप्स प्ले स्टोरवर परतले. याबाबत गुगलने एक ब्लॉग पोस्ट केला आहे. या अॅप्लिकेशन्समध्ये काही कोड्स होते ज्याद्वारे काही महत्वाचे फंक्शन्स वापरले जायचे.खालील फंक्शन्स वापरले जायचे-- कॉल रेकॉर्डिंग- VoIP रेकॉर्डिंग- लोकेशन मॉनिटरिंग- स्क्रीनशॉट्स- फोनच्या कॅमे-याने फोटो घेणे - डिव्हाइसची इन्फॉर्मेशन आणि फाइल्स अॅक्सेस करणं- कॉन्टॅक्ट्स, कॉल लॉग, एसएमएस, अॅपचा डेटा अॅक्सेस करणं- डिव्हाइस माइक रेकॉर्डिंग
काय आहे लिपिज्जा स्पायवेअर- लिपिज्जा हा एक मल्टि-स्टेज स्पायवेअर आहे, हा युझर्सच्या ईमेलमध्ये थेट शिरकाव करतो. त्यांचे मेसेज, लोकेशन, व्हॉइस कॉल्स आणि मीडिया अॅक्सेस करतो.
गुगल प्ले प्रोटेक्टमध्ये स्पायवेअर ओळखण्याची आणि पकडण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे असं कंपनीने सांगितलं. याशिवाय युझर्सच्या सुरक्षेसाठी काही सल्लेही देण्यात आलेले आहेत. गुगलकडून देण्यात आलेले सल्ले- - तुम्ही गुगल प्ले प्रोटेक्टचा हिस्सा असल्याची खात्री करा- अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचाच वापर करा- अननोन सोर्सेसचा वापर करत नसाल तर ते डिसेबल ठेवा- तुमच्या फोनमध्ये लेटेस्ट अॅंड्रॉइड सिक्युरिटी अपडेट नक्की ठेवा.