... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:02 AM2019-03-19T10:02:59+5:302019-03-19T10:09:45+5:30

काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 अ‍ॅप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवले आहेत.

google removes 200 games from playstore as researchers warns about a new malware | ... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स

... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स

Next
ठळक मुद्देसिमबॅडने (Dubbed SimBad) नावाच्या मॅलवेयरने अ‍ॅड सर्व्हिसिंग प्लॅटफॉर्मच्या फॉर्मेटमध्ये 200 हून अधिक अ‍ॅपवर परिणाम झाला आहे. गुगलने प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवले आहेत. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले असल्याची माहिती मिळत आहे. 

नवी दिल्ली - गुगलकडून तयार करण्यात आलेली अ‍ॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सिस्टम आहे. अ‍ॅन्ड्रॉइडचे मोठ्या प्रमाणात युजर्स असूनही हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित नसल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 अ‍ॅप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवले आहेत. अनेक मोबाईल अ‍ॅपमध्ये मॅलवेयर आणि अ‍ॅडवेयर असल्याची माहिती मिळत आहे. 

सिमबॅडने (Dubbed SimBad) नावाच्या मॅलवेयरने अ‍ॅड सर्व्हिसिंग प्लॅटफॉर्मच्या फॉर्मेटमध्ये 200 हून अधिक अ‍ॅपवर परिणाम झाला आहे. गुगल स्कॅनिंगच्या सिस्टमला मागे टाकून त्यावर मॅलवेयर परिणाम करू शकतो. हे मॅलवेयर एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालू राहू शकते. त्यामुळेच गुगलच्या प्ले स्टोअरमधून 200 गेम हटवण्यात आले आहेत. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले असल्याची माहिती मिळत आहे. 

सिक्योरिटी रिसर्चने परिणाम होणाऱ्या अ‍ॅपची लिस्ट गुगलला दिली. त्यानंतर गुगलने या सर्व अ‍ॅप्सना प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे. गुगलकडून या अ‍ॅप्सना प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यानंतरही काही युजर्सच्या फोनमध्ये हे अ‍ॅप अजूनही चालू असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या गेम्सना जवळपास 55 लाख युजर्सनी डाऊनलोड केले आहे. स्नो हेवी एक्सावेटर सिम्युलेटर, होवरबोर्ड रेसिंग आणि रियल ट्रॅक्टर फार्मिंग सिम्युलेटर अशा अ‍ॅपचा यात समावेश आहे.

'ही' 22 अ‍ॅप गुगलने हटवली; तुमच्याकडे यातलं अ‍ॅप नाही ना?
 

काही महिन्यांपूर्वी गुगलने प्ले स्टोअरवरून व्हायरस पसरवणारे 22 अ‍ॅप्लिकेशन हटवले होते. ब्रिटनची सायबर सिक्युरिटी कंपनी असलेल्या सोफोसनं या सर्व 22 अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस असल्याची माहिती दिली. या अ‍ॅप्समुळे युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेला बाधा पोहोचू शकते, असंही सोफोसनं स्पष्ट केलं होतं. 

20 लाखांहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते. त्यातील 19 अ‍ॅप्स याच वर्षी जून महिन्यात प्ले स्टोअरवर आले होते. या अ‍ॅप्समुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकरच संपते. सोफोसच्या मते ही 22 अ‍ॅप्स एका व्हायरससारखं काम करतात. तसेच हे अ‍ॅप फेक क्लिक करून महसूल मिळवत असल्याचंही समोर आलं होतं. तसेच युजर्सला फेक रिक्वेस्टही पाठवली जाते. अ‍ॅप्समध्ये व्हायरस असल्यामुळे युजर्सची बॅटरीही लवकर संपत असून, ही अ‍ॅप्स डेटाही मोठ्या प्रमाणात वापरतात.  

 

Web Title: google removes 200 games from playstore as researchers warns about a new malware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.