खलिस्तानची राजधानी 'लाहोर', गुगलने लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:42 PM2019-11-27T14:42:54+5:302019-11-27T14:46:29+5:30
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात.
नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र गुगलवर Capital Of Khalistan असं सर्च केल्यावर लाहोर अशी माहिती समोर येत आहे. खरंतर लाहोर हे शहर पाकिस्तानमध्ये आहे. पण गुगलवर कॅपिटल ऑफ खलिस्तान सर्च केल्यावर लाहोर दिसत असल्याने धक्का बसला आहे.
ऑनलाईन एनसायक्लोपीडिया (ज्ञानकोष) विकीपीडियाच्या माहितीनुसार, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम भारतातील क्षेत्रातील एका भागाला खलिस्तान म्हटले जाईल असे नमूद करण्यात आले आहे. खलिस्तानची राजधानी लाहोर असेल असंही त्यात म्हटलं आहे. तसेच लाहोर शहरात महाराजा रणजीत सिंह यांनी शीख साम्राज्याची स्थापना केली होती. त्यांच्या वंशजांनी अनेक शतके या भागात राज्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विकीपीडियात खलिस्तानामध्ये भारत आणि पाकिस्तानातील काही भाग असलेल्या पंजाबचा समावेश होईल असे म्हटले आहे. या व्यतिरिक्त, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, सिंध, हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील काही भाग खलिस्तानात दाखवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी गुगलवर भिकारी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला होता. हा शब्द टाकल्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत होता.
काही शोधायचे असल्यास गुगलवर पहिली धाव घेतली जाते. वेगवेगळ्या भाषेतून एखादा शब्दप्रयोग केलेला असला तरीही त्याचे भाषांतर करून शोधणाऱ्याला त्याला हवे ते दाखविले जाते. यामुळे हा शब्द जगाच्या कोणत्याही भाषेत गुगलवर टाकल्यास तो शब्द वापरल्या गेलेल्या वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीचा फोटो येतो. याआधी गुगलवर फेकू नावाने सर्च केल्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत होता. तर 'इडियट' हा शब्द सर्च केल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येतो. दहशतवाद्यांना मदत करत असल्याने अमेरिकेनेही मदतनिधी रोखला. अशा पेचात सापडल्याने पाकिस्तानचे दिवाळे निघाले आहे. यामुळे इम्रान खान यांनी अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्याही विक्रीस काढल्या आहेत. तसेच जिथून मिळेल तिथून मदत घेण्यासाठी ते हात पसरवत आहेत. यामुळे त्यांची इंटरनेटवर भिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. यामुळे गुगलवर हा शब्द टाकल्यास त्यांचा फोटो येत होता.