नवीन फोनवर जुने WhatsApp मेसेज कसे मिळवायचे? अशाप्रकारे गुगल ड्राईव्हवर करा चॅट बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: September 8, 2021 07:27 PM2021-09-08T19:27:30+5:302021-09-08T19:28:04+5:30
जर तुम्हाला एखाद्या नवीन डिवाइसवर जुने व्हॉट्सअॅप मेसेजेस हवे असतील तर तुम्ही जुन्या फोनवर व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन तो नव्या फोनवर रिस्टोर करू शकता.
WhatsApp युजर्स बऱ्याचदा नवीन फोन विकत घेतात किंवा जुन्या फोनमधील अॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करतात. अश्यावेळी व्हॉट्सअॅपवर पुन्हा लॉगिन केल्यावर त्यांचे सर्व मेसेजेस गायब झालेले असतात. असे होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅपवर चॅट बॅकअप आणि रिस्टोरचा पर्याय देण्यात आला आहे. यातील गुगल ड्राईव्हवर चॅट बॅकअप घेणे आणि तो रिस्टोर कसा करायचा याची माहिती आपण घेणार आहोत.
व्हॉट्सअॅपचे बॅकअप आणि रिस्टोर चॅट फिचर अनेकांना परिचयाचे असेल. ज्यांना या फिचरची माहिती नाही त्यांच्यासाठी हा लेख आहे. गुगल ड्राईव्हवर बॅकअप चॅट बॅकअप करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये गुगल अकॉउंट अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे, ज्या फोनमध्ये तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत आहात. तसेच नवीन फोन किंवा अॅपमध्ये चॅट रिस्टोर करण्यासाठी तुम्ही चॅट बॅकअप घेणे आवश्यक आहे.
व्हॉट्सअॅप चॅटचा गुगल ड्राईव्ह बॅकअप कसा घ्यायचा?
- सर्वप्रथम तुमच्या Android स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा.
- त्यांनतर उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- आता सेटिंग ऑप्शनची निवड करा.
- त्यानंतर चॅटवर क्लिक करून चॅट बॅकअपवर जा. इथे तुम्हाला गुगल ड्राईव्ह सेटिंगचा ऑप्शन मिळेल.
- इथे बॅकअप टू गुगल ड्राईव्हचा ऑप्शन असेल. त्यात नेव्हर व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय निवडा.
- त्याखाली गुगल अकॉउंटचा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक करा आणि अकॉउंट निवडा करा.
- आता बॅकअप ओव्हरवर क्लिक करून समोर आलेल्या ऑप्शनपैकी एकाची निवड करा.
- तुमच्या चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये होईल.
व्हॉट्सअॅप चॅट बॅकअप रिस्टोर कसा करायचा?
- नवीन फोनमध्ये किंवा जुन्या फोनयामध्ये नव्याने व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा.
- नंबर व्हेरिफाय करताच तुमच्या समोर रिस्टोरचा ऑप्शन येईल.
- त्यात रिस्टोरसाठी दिलेल्या बटणवर क्लिक करा.
- प्रोसेसर पूर्ण झाल्यावर नेक्स्टवर क्लिक करा.
- आता तुमचे जुने मेसेजेस तुमच्या व्हॉट्सअॅप अकॉउंटमध्ये दिसू लागतील.