जुना डेटा न गमावता असा बदला व्हॉट्सअॅप नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 01:27 PM2018-11-13T13:27:50+5:302018-11-13T13:37:40+5:30
व्हॉट्सअॅप युजर्सची ही समस्या लक्षात विचारात घेऊन जुना डेटा न गमावता व्हॉट्सअॅप नंबर कसा बदलायचा हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेकजण त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करतात. मात्र काही कारणास्तव अनेकांना जुना व्हॉट्सअॅप नंबर बदलायचा असतो. त्यावेळी नंबर बदलल्यास सर्व डेटा डिलीट होतो. व्हॉट्सअॅप युजर्सची ही समस्या लक्षात विचारात घेऊन जुना डेटा न गमावता व्हॉट्सअॅप नंबर कसा बदलायचा हे जाणून घेऊया.
जुना व्हॉट्सअॅप नंबर बदलण्यासाठी Change Number फीचरचा वापर करता येतो. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअॅप नंबरचे आधीचे मेसेज, माहिती, ग्रुप हे जुन्या नंबरवरून नव्या नंबरवर पाठवू शकता. Change Number चा वापर करून चॅट हिस्ट्री आपण त्याच फोनवरील नव्या नंबरवर अकाऊंटवर घेऊ शकतो. मात्र व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमचा नंबर सेव्ह असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हे करताना फोनचं डेटा कनेक्शन अॅक्टीव्ह असणे गरजेचे आहे.
असा करा नवा नंबर व्हॉट्सअॅपला कनेक्ट
- नवीन नंबरचं नवं सिम फोनमध्ये टाका.
- आता तुमचं व्हॉट्सअॅप सुरू करा.
- तुमचा जुना नंबर व्हेरिफाईड आहे का हे आधी चेक करा. यासाठी 'WhatsApp' च्या 'Menu Button' वर क्लिक करा. त्यानंतर 'Settings' मध्ये जाऊन प्रोफाईल फोटोवर टॅप करून व्हेरिफाईड नंबर जाणून घेऊ शकता.
- टॉप बॉक्समध्ये जुना फोन नंबर टाका.
- त्यानंतर बॉटम बॉक्समध्ये तुमचा नवा नंबर टाका.
- स्क्रीनवर वरती Done असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा नवा नंबर व्हेरिफाय करण्याचं सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्ही नव्या नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरू शकता.