How To Remove Password from PDF File: पीडीएफ फाईल लॉक आहे? असा काढून टाका पासवर्ड
By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2021 07:06 PM2021-06-25T19:06:02+5:302021-06-25T19:06:37+5:30
How To Remove Password from PDF File: बऱ्याचदा तुमच्या बँकेची स्टेटमेंट, इन्कम टॅक्स संबंधित फाईल्स इत्यादी पासवर्ड असलेल्या पीडीएफ फाईल स्वरूपात येतात. अश्या फाईल्सचा पासवर्ड काढून टाकण्याची सोप्पी पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.
PDF फाईलच्या सुरक्षेसाठी त्या पासवर्डने लॉक केल्या जातात. त्यामुळे पासवर्डविना त्या फाईल्स उघडता येत नाहीत. परंतु वारंवार एखादी फाईल वापरायची असेल तर पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल आपली डोकेदुखी वाढवू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पीडीएफ फाईलचा पासवर्ड कसा काढून टाकायचा हे सांगणार आहोत.
बऱ्याचदा तुमच्या बँकेची स्टेटमेंट, इन्कम टॅक्स संबंधित फाईल्स इत्यादी पासवर्ड असलेल्या पीडीएफ फाईल स्वरूपात येतात. अश्या फाईल्सचा पासवर्ड काढून टाकण्याची सोप्पी पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.
अँड्रॉइड फोनमध्ये PDF फाईलचा पासवर्ड कसा काढून टाकायचा
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल ड्राइव्हमध्ये PDF फाईल ओपन करावी लागेल.
- आता फाईल अनलॉक करण्यासाठी पासवर्ड टाका.
- त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्यानंतर प्रिंटवर क्लिक करा आणि डाव्या कोपऱ्यात Save as PDF वर क्लिक करा आणि Save वर क्लिक करा.
- आता ती PDF फाईल पासवर्डविना सेव होईल.
पीसीमध्ये PDF फाईलचा पासवर्ड कसा काढून टाकायचा
- यासाठी तुम्हाला Google Chrome वर PDF फाईल ओपन करावी लागेल.
- त्यानंतर पासवर्ड टाकून फाईल अनलॉक करा.
- त्यानंतर Ctrl+P किंवा Printer Icon वर क्लिक करा.
- आता Save as PDF सिलेक्ट करा Save वर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्ही पीडीएफ फाईलचा पासवर्ड काढून ती सेव करू शकता.