17 तासांच्या बॅटरी बॅकअपसह HP Spectre x360 14 2-in-1 लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:55 PM2021-08-25T18:55:38+5:302021-08-25T18:55:53+5:30
HP Spectre x360 14 price: HP Spectre x360 14 लॅपटॉपची प्रारंभिक किंमत 1.2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
HP Spectre x360 14 2-in-1 कन्वर्टेबल लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. 3:2 अस्पेक्ट रेश्योसह सादर होणारा हा HP चा पहिला 2-in-1 कन्वर्टेबल लॅपटॉप आहे. Spectre x360 सीरिज HP कंपनीची हायएंड लॅपटॉप लाइनअप आहे. यात आता कंपनीने HP Spectre x360 14 2-in-1 चा समावेश केला आहे. हा लेटेस्ट प्रीमियम अल्ट्राबुक मल्टीपल SKU, अनेक प्रोसेसर, मेमरी आणि स्टोरेज कॉम्बिनेशनसह सादर करण्यात आला आहे.
HP Spectre x360 14 ची किंमत
HP Spectre x360 14 लॅपटॉपची प्रारंभिक किंमत 1.2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत हा लॅपटॉप कंपनीच्या ऑफलाईन रिटेल स्टोर्स आणि HP World रिटेल आउटलेटसह Amazon, Flipkart आणि HP च्या ऑफिशियल वेबसाइटवरून विकत घेता येईल.
HP Spectre x360 14 चे स्पेसिफिकेशन्स
HP Spectre x360 14 मध्ये कंपनीने 13.5-इंचाचा 3:2 अस्पेक्ट रेश्योसह OLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 3000 x 2000 पिक्सल आहे. हा डिस्प्ले मल्टीटच इनपुट आणि 100% DCI-P3 कलर गमुट कवरेज देण्यात आला आहे. HP India च्या वेबसाइटवर हा लॅपटॉप 11th Gen Intel Core i7-1165G7 प्रोसेसरसह लिस्ट करण्यात आला आहे.
तसेच यात 16GB LPDDR4 RAM, आणि 1TB NVMe TLC M.2 SSD स्टोरेज देण्यात आली आहे. हा लॅपटॉप AI ऑडियो बूस्टला सपोर्ट करतो. या लॅपटॉपमध्ये चार Bang & Olufsen ब्रँडचे स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिविटीसाठी लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.2, दोन USB-C 4.0 पोर्टसह Thunderbolt 4 आणि DisplayPort 1.4, एक USB-A पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. नवीन Spectre मध्ये 66Wh बॅटरी, HD वेबकॅम, बॅकलिट की-बोर्ड देण्यात आला आहे.