आयबॉलचा स्लाईड एन्झो व्ही ८ टॅबलेट दाखल
By शेखर पाटील | Published: February 28, 2018 12:46 PM2018-02-28T12:46:49+5:302018-02-28T12:46:49+5:30
आयबॉल कंपनीने ग्राहकांसाठी आपला स्लाईड एन्झो व्ही ८ हा टॅबलेट सादर करण्याची घोषणा केली आहे.
आयबॉल कंपनीने ग्राहकांसाठी आपला स्लाईड एन्झो व्ही ८ हा टॅबलेट सादर करण्याची घोषणा केली आहे.
आयबॉल कंपनीने अलीकडच्या काळात भारतीय टॅबलेट मॉडेल्सच्या बाजारपेठेत आपली स्थिती भक्कम केली आहे. ताज्या आकडेवारीतून ही बाब अधोरेखीत झाली आहे. या पार्श्वभूमिवर, आयबॉल स्लाईड एन्झो व्ही८ हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार यात ७ इंच आकारमानाचा मल्टीटच या प्रकारातील आणि १०२४ बाय ६०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. यात मेटल बॉडी प्रदान करण्यात आली आहे. तर हा टॅबलेट ब्राऊन-ब्लॅक या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. ऑटो-फोकस या फिचरसह यातील मुख्य कॅमेरा ५ तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा असेल.
आयबॉल स्लाईड एन्झो व्ही ८ या टॅबलेट मॉडेलमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचे अॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात मराठी आणि हिंदीसह २२ भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर याशिवाय अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. हा टॅबलेट ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.