असं फिचर फक्त Apple चं देऊ शकतं; भन्नाट सेल्फी कॅमेऱ्यासह येणार iPhone 14 सीरिज
By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2022 12:25 PM2022-06-14T12:25:24+5:302022-06-14T12:27:31+5:30
iPhone 14 सीरीजचा सेल्फी कॅमेऱ्यात अनेक सुधारणा करण्यात येतील.
Apple असं ब्रँड आहे ज्याच्या डिवाइसची चर्चा लाँच होण्याआधीच वर्षभर सुरु असते. iPhone 14 सीरीजच्या लिक्सची सुरुवात आयफोन 13 सीरिजच्या आधीपासून सुरु झाली होती. आगामी आयफोन सीरिज सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. परंतु तरीही या लाईनअप संबंधित लिक्स सतत येत आहेत. आता सीरिजमधील सेल्फी कॅमेऱ्याची माहिती लीक झाली आहे. तसेच हॅन्ड्स ऑन व्हिडीओ देखील समोर आला आहे.
लेटेस्ट लीकनुसार, iPhone 14 सीरीजच्या सेल्फी कॅमेऱ्यात अनेक शानदार इम्प्रूवमेंट्स मिळतील. तसेच आयफोन 14 सीरीजच्या हॅन्ड्स-ऑन व्हिडीओमधून iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max या चार मॉडेल्सची डिजाइन समोर आली आहे.
Ming-Chi Kuo यांनी माहिती दिली आहे की, नवीन आयफोन मॉडेल्सच्या सेल्फी कॅमेऱ्यात अनेक इम्प्रूवमेंट्स दिसतील. यात ऑटो फोकस सपोर्ट मिळेल, ज्यामुळे व्हिडीओ आणि सेल्फी काढताना सब्जेक्टवर सहज फोकस होईल. यासाठी आगामी iPhones च्या सेल्फी कॅमेऱ्यासाठी 6P लेन्स सेटअप मिळेल, जी f/1.9 अपर्चरसह येईल. याआधी आलेल्या माहितीनुसार, iPhone 14 सीरीजमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी कॅप्सूल शेप कटआउट मिळेल.
हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ
iupdate नावाच्या युट्युब चॅनेलवर iPhone 14 सीरीजच्या डमी यूनिट्सचा एक हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max असे चार मॉडेल सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार, iPhone 14 आणि iPhone 14 Max च्या डिजाइनमध्ये जास्त अंतर दिसत नाही. तसेच iPhone 14 Pro मध्ये एक मोठा कॅमेरा बंप दिसत आहे.