इस्त्रो सध्या एक वेगळ्या कल्पनेवर प्रयोग करत आहे. इस्त्रो येत्या २८ जानेवारीला रीयुजेबल लाँच व्हेईकल (RLV) च्या उड्डाणाचा प्रयोग करणार आहे. याची माहिती इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी दिली आहे.
हे एक स्वदेशी स्पेस शटल आहे. यास ऑर्बिटल री-एंट्री व्हेईकल देखील म्हटले जाते. लाँचिंगपूर्वी ते एका छोट्या रॉकेट किंवा हेलिकॉप्टरला जोडून जमिनीपासून तीन किमी वर नेण्यात येणार आहे. तेथून ते स्वत:च खाली येईल आणि स्वत:च लँडिंग करेल. हा प्रयोग सफल राहिला तर भारत केवळ सॅटेलाईट लाँचच करेल असे नाही तर आपल्या आकाशाची सुरक्षा करण्यासही तो सक्षम होणार आहे.
अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिका, रशिया, चायना फायदा उठवू पाहत आहेत. अशा प्रकारच्या यानाद्वारे कोणत्याही दुश्मनाच्या सॅटेलाईटला उध्वस्त करता येणार आहे. अशा विमानांमधून डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) चालवता येते. उर्जेचा गोळा पाठवून शत्रूची संचार सिस्टिम उध्वस्त करता येते. पॉवर ग्रीड किंवा कॉम्प्युटर प्रणाली देखील नष्ट करता येतात. याद्वारे भारत शत्रूच्या प्रदेशात देखील धुमाकूळ घालू शकतो.
2030 पर्यंत हा प्रकल्प यशस्वी करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. असे झाल्यास पुन्हा पुन्हा रॉकेट बनवण्याचा खर्च वाचणार आहे. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर तो परत येईल. थोड्या देखभालीनंतर, तो उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी परत पाठविला जाऊ शकतो. यामुळे अंतराळ मोहिमेचा खर्च किमान 10 पटीने कमी होईल. अशा स्पेस शटल बनवणाऱ्यांमध्ये सध्या फक्त अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जपान यांचा समावेश आहे. रशियाने 1989 मध्ये असेच एक शटल बनवले होते ज्याने एकदाच उड्डाण केले होते.