Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 06:41 AM2018-12-30T06:41:09+5:302018-12-30T06:41:53+5:30

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा JIO Happy New Year ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

Jio Happy New Year Offer: Jio's Rs. 399 prepaid recharge now comes with '100 per cent cashback' | Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक

Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक

Next

नवी दिल्ली : रिलायन्सजिओने पुन्हा एकदा JIO Happy New Year ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी 399 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ही कॅशबॅक ऑफर रिलायन्सच्या AJIO कूपनच्या माध्यमातून दिला जाणार आहे. म्हणजेच, AJIO च्या वेबसाइटवरुन ग्राहक कोणत्याही खरेदीसाठी या कूपनचा वापर करु शकणार आहेत.
रिलायन्स जिओच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना जिओ नंबरवर 399 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. रिचार्ज केल्यानंतर कंपनीकडून 399 रुपयांचे AJIO कूपन दिले जाईल. AJIO वेबसाइटवर MyCoupon सेक्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान, यामध्ये अजून एक अडचण आहे. ती म्हणजे ग्राहकांना AJIO वेबसाइटवर एक हजार रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. उदाहरणार्थ, या बेवसाइटवरुन एक हजार रुपयांच्या खरेदीवर कूपनला रिडिम केल्यानंतर आपल्याला 599 रुपये द्यावे लागणार आहेत. 
JIO Happy New Year ऑफर रिलायन्स जिओच्या जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी आहे. ऑफरची सुरुवात झाली असून 31 जानेवारी 2019 पर्यंत आहे. दरम्यान, ग्राहक 399 रुपयांच्या कूपनला AJIO वेबसाइटवर 15 मार्च 2019 पर्यंत रिडिम करु शकतात.

काय आहे AJIO?
रिलायन्स कंपनीचे AJIO फॅशन बेस्ड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली. AJIO वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करण्यात येते. रिलायन्स जिओची JIO Happy New Year ही ऑफर AJIOच्या जनजागृतीसाठी आणली असल्याचे समजते.

399 रुपयांचा प्लॅनमधील सुविधा...
या प्लॅन अंतर्गत 399 रुपयांत 84 दिवसांच्या वैधतेसह 84 जीबी डेटा मिळणार आहे. या सोबतच अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग फ्री आणि फ्री मेसेजची सुविधाही मिळणार आहे. 
 

Web Title: Jio Happy New Year Offer: Jio's Rs. 399 prepaid recharge now comes with '100 per cent cashback'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.