Jio Phone Next Price: फक्त 1999 रुपयांमध्ये घरी आणता येणार Jio Phone Next; कंपनीने केली किंमतीची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: October 29, 2021 07:15 PM2021-10-29T19:15:42+5:302021-10-29T19:15:48+5:30

Jio Phone Next Price Launch Details: जियोने दावा केला आहे कि हा फोन जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल, जो फक्त 1,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जात येईल. जर ईएमआय ऑप्शन्सविना हा फोन विकत घ्यायचा असेल तर 6,499 रुपये दयावे लागतील.

Jio phone next price in india rs 6499 rs 1999 financing launch pragati os november 4  | Jio Phone Next Price: फक्त 1999 रुपयांमध्ये घरी आणता येणार Jio Phone Next; कंपनीने केली किंमतीची घोषणा 

Jio Phone Next Price: फक्त 1999 रुपयांमध्ये घरी आणता येणार Jio Phone Next; कंपनीने केली किंमतीची घोषणा 

googlenewsNext

Jio Phone Next Price Launch: जेव्हा जेव्हा जियो एखाद्या नव्या प्रोडक्टची घोषणा करते तेव्हा तेव्हा भारतीयांची उत्सुकता वाढते. असेच Jio Phone Next 4G बाबत देखील झाले आहे. या फोनची घोषणा झाल्यापासून भारतीय या फोनची वाट बघत आहेत. आतापर्यंत या फोनच्या स्पेक्सची माहिती समोर आली होत परंतु या मोबाईलच्या किंमतीचे फक्त अंदाज बांधले जात होते. आज जियो आणि गुगलने बनवलेल्या स्वस्त 4G फोनची किंमत समोर आली आहे.  

जियोने दावा केला आहे कि हा फोन जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल, जो फक्त 1,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जात येईल. परंतु ही किंमत फक्त डाउन पेमेंट असेल, त्यानंतर ग्राहकांना उर्वरित रक्कम ईएमआय स्वरूपात द्यावी लागेल.  

Jio Phone Next 4G Price 

Jio Phone Next जर ईएमआय ऑप्शन्सविना विकत घ्यायचा असेल तर 6,499 रुपये दयावे लागतील. तर कंपनीच्या फायनान्सिंग ऑप्शनसह युजर्स हा नवीन जियोफोन नेक्स्ट 4G स्मार्टफोन फक्त 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील आणि त्यासाठी Reliance ने सादर केलेल्या ईएमआय ऑप्शन मधील एकाची निवड करावी लागेल. या फोनसाठी कंपनीने Always-on plan, Large Plan, XL Plan आणि XXL Plan असे तीन फायनान्सिंग प्लॅन्स सादर केले आहेत. चला जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत: 

  • Always On: सर्वात पहिल्या प्लॅनचे नाव Always On असे आहे. यात हा फोन 18 किंवा 24 महिन्यांच्या EMI वर विकत घेता येईल. 24 महिन्यांचा पर्याय निवडल्यास ग्राहकांना दरमहा 300 रुपये द्यावे लागतील. तर 18 महिन्यांच्या पर्यायात दरमहा 350 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 5GB डेटा आणि 100 मिनिटांचा टॉक टाइम देण्यात येईल. हा डेटा आणि टॉकटाइम ईएमआय संपेपर्यंत मिळेल.  
  • Large Plan: लार्ज प्लॅनमध्ये देखील दोन पर्याय आहेत. 24 महिन्यांच्या EMI चा पर्याय घेतल्यास प्रत्येक महिन्याला 450 रुपये आणि 18 महिन्यांसाठी 500 रुपये द्यावे लागतील. लार्ज प्लॅनमधील ग्राहकांना ईएमआय संपेपर्यंत डेली 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळेल.  
  • XL Plan: कंपनीने XL Plan देखील सादर केला आहे. यातील 24 महिन्यांच्या EMI ऑप्शनमध्ये दरमहा 500 रुपये आणि 18 महिन्यांसाठी 550 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग असे बेनिफिट मिळतील.  
  • XXL Plan: कंपनीने सादर केलेला शेवटचा प्लॅन म्हणजे XXL plan. यात 24 महिन्यांच्या ईएमआयची निवड केल्यास ग्राहकांना 550 रुपये आणि 18 महिने सिलेक्ट केल्यास 600 रुपये दरमहा द्यावे लागतील. या प्लॅनची निवड करणाऱ्या ग्राहकांना देखील डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळतील. ज्यात रोज 2.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश असेल.  

महत्वाची बाब म्हणजे EMI ऑप्शन सिलेक्ट केल्यावर Jio Phone Next घेणाऱ्या ग्राहकांना 501 रुपये प्रोसेसिंग फी म्हणून अतिरिक्त द्यावे लागतील.  

JioPhone Next Specification 

या फोनमध्ये 5.45-इंचाचा (720 X 1440 पिक्सल) एचडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास-3 सह सादर केला जाईल. फोनयामध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी मिळेल. ही मेमरी 512जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनेवाढवता येईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट मिळेल. 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. Jio Phone Next मध्ये 3500एमएएचची बॅटरी देण्यात येईल. जियोफोन नेक्स्ट गुगल अँड्रॉइडने बनवलेल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तसेच यात अनेक जियो आणि गुगल अ‍ॅप्स प्रीलोडेड मिळतील.  

हा एक ड्युअल सिम फोन आहे त्यामुळे जियो व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या सिमचा देखील वापर करता येईल. परंतु एक सिम स्लॉटमध्ये जियो सिम टाकणे बंधनकारक असेल. तसेच डेटा फक्त जियो सिमवरून वापरता येईल. दुसऱ्या सिमचा वापर फक्त कॉलिंगसाठी करता येईल.  

Web Title: Jio phone next price in india rs 6499 rs 1999 financing launch pragati os november 4 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.