नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक प्लॅन बाजारात आणला आहे. आयडियाने 499 रुपयांचा प्लॅन आणला असून यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मोफत पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची मर्यादा 82 दिवसांची आहे. याआधी आयडियाने बाजारात 189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध होता. या प्लॅनची 56 दिवसांची मर्यादा आहे.
रिलायन्स जिओच्या 498 रुपयांच्या प्लॅनला टक्करआयडियाने लाँच केलेला 499 रुपयांचा प्लॅन हा सध्या व्होडाफोन कंपनीकडून सुरु असलेल्या 511 रुपयांच्या प्लॅन सारखा आहे. व्होडाफोनच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. तर याची मर्यादा 84 दिवसांची आहे. दरम्यान, आयडिया हा प्लॅन खासकरुन टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओला टक्कर देणारा आहे. जिओच्या 498 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 91 दिवसांसाठी रोज 2 जीबी डेटा मिळत आहे.
आयडियाच्या 499 रुपयांच्या प्लॅनचे फायदेआयडियाच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 4G/3G/2G चा 2 जीबी डेटा रोज मिळणार आहे. मात्र, वेळेची मर्यादा संपल्यानंतर 10 केबीसाठी 4 पैसे इतके चार्ज लागणार आहे. तसेच, ग्राहकांना कंपनीने अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली आहे. मात्र, एका दिवशी 250 मिनिटांपेक्षा जास्त वापर केल्यास ग्राहकांना एक पैसा प्रति सेकंदनुसार चार्ज आकारले जाणार आहे. जे ग्राहक सात दिवसांच्या आत एक हजार मिनिटांपेक्षा जास्त वापर केल्यास, त्यांना बाकीच्या सात दिवसांमध्ये रोज एक पैसा प्रति सेकंद यानुसार चार्ज लावला जाणार आहे.