जंबो बॅटरीयुक्त असुस झेनफोन मॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:27 AM2018-02-28T10:27:24+5:302018-02-28T10:27:24+5:30

असुस कंपनीने उत्तम दर्जाची बॅटरी असणार्‍या झेनफोन मॅक्स (एम१) या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे.

Jumbo battery powered Asus Zenfone Max | जंबो बॅटरीयुक्त असुस झेनफोन मॅक्स

जंबो बॅटरीयुक्त असुस झेनफोन मॅक्स

googlenewsNext

असुस कंपनीने उत्तम दर्जाची बॅटरी असणार्‍या झेनफोन मॅक्स (एम१) या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे.

बार्सिलोना शहरात सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये विविध कंपन्या आपापले नवीन मॉडेल्स सादर करत आहेत. या अनुषंगाने असुस कंपनीनेही आपल्या विविध मॉडेल्सचे अनावरण केले. यात झेनफोन ५ या मालिकेसह झेनफोन मॅक्स (एम१) हा स्मार्टफोन सादर करण्यात आला. या मॉडेलची सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय. ही बॅटरी उत्तम बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील उर्वरित फिचर्स हे मिड रेंज स्मार्टफोनप्रमाणे आहेत.

असुस झेनफोन मॅक्स (एम१) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस एफ/२.० अपार्चर, ड्युअल एलईडी फ्लॅश आदी फिचर्सने सज्ज असणारा एक कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे. तर दुसरा कॅमेरा १२० अंशाच्या वाईड अँगल लेन्सने युक्त तसेच ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.२ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४२५ व ४३० या दोन प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. याची रॅम ३ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. तर यातील डिस्प्ले ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच ७२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असेल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह फेस अनलॉक हे फिचरदेखील देण्यात आले आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा झेनयुआय ५.० हा युजर इंटरफेस असेल.

असुस झेनफोन मॅक्स (एम१) हा स्मार्टफोन डीप सी ब्लॅक, सनलाईट गोल्ड आणि रूबी रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारपेठेत उतारण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. यासोबत  अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

Web Title: Jumbo battery powered Asus Zenfone Max

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.