जेव्हीसीची ब्ल्यु-टुथ साऊंड सिस्टीम
By शेखर पाटील | Published: May 28, 2018 04:12 PM2018-05-28T16:12:39+5:302018-05-28T16:12:39+5:30
जेव्हीसी कंपनीने भारतीय बाजारपेठेत ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारी साऊंड सिस्टीम सादर करण्याची घोषणा केली आहे.
जेव्हीसी कंपनीने भारतीय बाजारपेठेत ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारी साऊंड सिस्टीम सादर करण्याची घोषणा केली आहे.
जेव्हीसी कंपनीने ग्राहकांसाठी एक्सएस-एक्सएन५११ए ही साऊंड सिस्टीम बाजारपेठेत उपलब्ध केली आहे. खरं तर, सध्या मार्केटमध्ये अनेक ब्ल्यु-टुथ स्पीकर्स उपलब्ध आहेत. तथापि, हे मॉडेलमध्ये ५.१ या प्रकारातील अतिशय दर्जेदार अशा ऑडिओ सिस्टीमच्या प्रकारातील आहे. यामध्ये ६.५ इंच आकारमानाचे आणि ५० वॅट क्षमतेचे एक सब-वुफर तर ३ इंच आकारमानाच्या पाच सॅटेलाईट स्पीकर्सचा समावेश आहे. याचे एकत्रीत पीएमपीओ या प्रकारातील आऊटपुट १३५ वॅट इतके आहे. यामुळे आपल्या स्मार्टफोनवरील संगीताचा अगदी होम थिएटरप्रमाणे आनंद घेण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात युसएबी पोर्ट व ऑक्झ-इन पोर्टदेखील देण्यात आलेले आहे. तसेच यात कार्ड-रीडरदेखील असल्यामुळे कुणीही मायक्रो-एसडी कार्डमधील संगीताला यात ऐकू शकतात. तर यातील ब्ल्यु-टुथची रेंज ही १० मीटर असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ध्वनीतील बास आणि ट्रबलचे योग्य संतुललन राखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच्या वुफरवर अतिशय आकर्षक एलईडी लाईट देण्यात आले असून ते संगीताच्या तालावर चालू-बंद होतात.
जेव्हीसीची एक्सएस-एक्सएन५११ए ही साऊंड सिस्टीम बाजारपेठेत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये ११,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून हे मॉडेल मर्यादीत कालावधीसाठी ६४९९ रूपयात उपलब्ध आहे.