एलजी एक्स ४ स्मार्टफोनची घोषणा

By शेखर पाटील | Published: March 6, 2018 03:40 PM2018-03-06T15:40:58+5:302018-03-06T15:40:58+5:30

एलजी एक्स ४ या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात कंपनीने विकसित केलेल्या एलजी पे या पेमेंट सिस्टीमचा समावेश आहे.

LG X4 smartphone review | एलजी एक्स ४ स्मार्टफोनची घोषणा

एलजी एक्स ४ स्मार्टफोनची घोषणा

Next

एलजी कंपनीने आपल्या एलजी पे या पेमेंट सिस्टीमचा सपोर्ट असणारा एक्स ४ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली आहे.

एलजी एक्स ४ या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात कंपनीने विकसित केलेल्या एलजी पे या पेमेंट सिस्टीमचा समावेश आहे. याचा उपयोग करून युजर विविध व्यवहार करू शकतो. सध्या तरी हे फिचर दक्षिण कोरियातील मॉडेलमध्ये समाविष्ट करण्यात आले असले तरी भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये याचा समावेश असेल की नाही? याबाबत एलजी कंपनीने कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच याच्या मागील बाजूस असणारे फिंगरप्रिंट स्कॅनरमध्ये अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात नियमित फिंगरप्रिंट स्कॅनिंग तर होतेच, पण याच्या मदतीने सेल्फी आणि स्क्रीनशॉट घेण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे.  यातील बहुतांश फिचर्स हे मध्यम किंमत पट्टयातील स्मार्टफोनप्रमाणे आहेत.

एलजी एक्स ४ या मॉडेलमध्ये ५.३ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा  आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज दिले आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हा स्मार्टफोन ३,००० मिलीअँपिअर क्षमतेचा असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, एनएफसी, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

Web Title: LG X4 smartphone review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.