भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने गेल्यावर्षी बाजारात पुनरागमन करत IN series सादर केली होती. या सीरिजमध्ये कंपनीने Micromax IN Note 1 आणि Micromax IN 1B असे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. त्यांनतर या सिरीजमध्ये Micromax IN 1 स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. आता कंपनी अजून एक स्मार्टफोन In सीरीजमध्ये लाँच करणार आहे.
माइक्रोमॅक्सचा या आगामी स्मार्टफोनचे नाव Micromax IN 2C असे असू शकते. कंपनीचा हा या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसले आहेत. या लिस्टिंगमध्ये Micromax IN 2C च्या चिपसेट, रॅम आणि सॉफ्टवेयरची माहिती समोर आली आहे.
Micromax IN 2C चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
गीकबेंच लिस्टिंगवर Micromax IN 2C स्मार्टफोन Unisoc T-610 चिपसेटसह लिस्ट करण्यात आला आहे. या चिपसेटमधील आठ कोर पैकी दोन कोर – Cortex-A75 CPU आणि सहा Cortex-A55 CPU कोर आहेत. माइक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये Mali-G52 GPU देण्यात येईल बेंचमार्क लिस्टिंगनुसार यात 4GB RAM आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Micromax IN 2C स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 347 पॉइन्ट स्कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,127 पॉइन्ट्स मिळाले आहेत.
गीकबेंच लिस्टिंगनुसार, Micromax IN 2C स्मार्टफोनच्या रिसर्च आणि डेवलपमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा फोन लाँच होण्यास जास्त वेळ लागणार नाही. या फोनच्या किंमतीची माहिती मिळाली नाही. परंतु सीरिजमधील इतर फोन्सप्रमाणे हा फोन लो बजेटमध्ये लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे.