नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्टनं स्वतःची कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम Windows 7चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद केल्यानंतर आता त्याचा एक्सटेंडेट सपोर्ट (अपडेट्स)सुद्धा बंद करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टनं Windows 7ला नवं फीचर्सशी जोडण्याआधीच हा निर्णय घेतल्यानं तंत्रज्ञानजगतात खळबळ उडाली आहे. आता 14 जानेवारी 2020पर्यंत मायक्रोसॉफ्ट एक्सटेंडेड सपोर्टही बंद करण्याची शक्यता आहे. कंपनीनं यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.एक्सटेंडेड सपोर्ट बंद केल्यानंतरही कॉम्प्युटर काम करणं सुरूच ठेवणार आहे. परंतु युजर्सला यात सुरक्षा अपडेट्स मिळणं बंद होणार आहे. तसेच 20 जानेवारी 2020नंतरही Windows 7 इन्स्टॉलेशन आणि एक्टिव्हेशन करता येणार आहे. परंतु Windows 7 वापरणं युजर्ससाठी धोक्याचं ठरू शकतं, अशी सूचनाही कंपनीनं दिली आहे. कारण Windows 7मध्ये आपल्याला सुरक्षाच फीचर्स आणि वायरसपासून बचावासाठी कोणतीही यंत्रणा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कंपनीनं युजर्सला Windows 7ला Windows 10मध्ये (अपग्रेड) अद्ययावत करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील जास्त करून कॉम्प्युटर आणि एटीएम मशिन्समध्ये Windows 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते.अशातच Windows 7मध्ये अपडेट्स येणं बंद झाल्यास सुरक्षेचा मोठा धोका उद्भवू शकतो. तसेच कॉम्प्युटर आणि एटीएम मशिनमधल्या सुरक्षेचा डेटा चोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मायक्रोसॉफ्टनं 2015मध्ये Windows 10 लाँच केलं होतं. परंतु Windows 7 युजर्सला वापरण्यासाठी सोयीस्कर वाटत होते. त्यामुळेच Windows 10ऐवजी Windows 7 युजर्स वापरत होते. सध्या तरी Windows 10 वापरणारे 70 कोटी युजर्स आहेत. त्यातच वेब एनालिटिक्स फर्म स्टेटकाउंटर आणि नेटमॅमार्केट्सनंही सर्वात प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टीम असल्याचं सांगितलं आहे.
कॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टनं Windows 7बाबत घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 1:49 PM
मायक्रोसॉफ्टनं Windows 7ला नवं फीचर्सशी जोडण्याआधीच हा निर्णय घेतल्यानं तंत्रज्ञानजगतात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देWindows 7चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद केल्यानंतर आता त्याचा एक्सटेंडेट सपोर्ट (अपडेट्स)सुद्धा बंद करण्यात येणार आहे.मायक्रोसॉफ्टनं Windows 7ला नवं फीचर्सशी जोडण्याआधीच हा निर्णय घेतल्यानं तंत्रज्ञानजगतात खळबळ उडाली14 जानेवारी 2020पर्यंत मायक्रोसॉफ्ट एक्सटेंडेड सपोर्टही बंद करण्याची शक्यता आहे.