खास गेमिंग फीचर्ससह Motorola Revou-Q स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:21 PM2021-09-30T13:21:43+5:302021-09-30T13:23:24+5:30

Android Smart TV Motorola Revou-Q: Motorola ने आपला Revou-Q स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. यात गेमिंगच्या चाहत्यांसाठी खास वायरलेस गेमपॅड फिचर देखील जोडला आहे.

Motorola revou q qled smart tv launched in india with android tv 11 and game engine check price features and specifications  | खास गेमिंग फीचर्ससह Motorola Revou-Q स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

खास गेमिंग फीचर्ससह Motorola Revou-Q स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

Next

मोटोरोला Revou-Q स्मार्ट टीव्ही भारतात लाँच झाला आहे. हा टीव्ही कंपनीने दोन आकारात सादर केला आहे ज्यात 50 इंच आणि 55 इंचाचा समावेश आहे. तसेच यात गेमिंगच्या चाहत्यांसाठी खास वायरलेस गेमपॅड फिचर देखील जोडला आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवरून आगामी Big Billion Days Sale मधून विकत घेता येईल.  

किंमत 

Motorola Revou-Q स्मार्ट टीव्हीच्या 50 इंचाच्या मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे. तसेच 55 इंचाच्या मॉडेलची किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही मॉडेल फ्लिपकार्टवर 3 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध विकत घेता येतील. तसेच आगामी फेस्टिव्हल सेलमध्ये या स्मार्ट टीव्हीवर काही खास ऑफर देखील देण्यात येतील.  

Motorola Revou-Q स्पेसिफिकेशन्स 

Motorola Revou-Q स्मार्ट टीव्ही क्वॉन्टम डॉट टेक्नॉलॉजीवर आधारित Active Quantum Color फिल्टर स्क्रीन देण्यात आली आहे. यात Dolby Vision, HDR10 आणि 102 टक्क्यांपर्यंत NTSC कलर गमुट मिळतो. गेमिंग चाहत्यांसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये स्पेशल गेम इंजिन 2.2 फीचर देण्यात आले आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये हार्डवेयर पाहता यात 60W चे ट्विन स्पिकर्स मिळतात, जे Dolby Atmos साउंडला सपोर्ट करतात.  

हा Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि यात Google Assistant वॉयस रेकोग्नेशन सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये Realtek चा प्रोसेसर, ARM Mali-G31 MC2 GPU आणि 2GB RAM ला सपोर्ट करतो, यात 16GB इंटरनल स्टोरेज मिळते. यातील AutoTuneX टेक्नॉलॉजी ब्राईटनेस, कलर स्केल आणि कॉन्ट्रास्ट आपोआप अ‍ॅडजस्ट करते. यात कनेक्टिविटीसाठी Wi-Fi, HDMI 2.1 आणि USB पोर्ट देण्यात आले आहेत. 

Web Title: Motorola revou q qled smart tv launched in india with android tv 11 and game engine check price features and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.