फेसबुकने विकत घेतलेले लोकप्रिय मॅसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी एक मजेशीर फिचर दिले आहे. अॅपमध्ये नवीन स्टीकर देण्यात आले आहेत. मात्र, हे फिचरचे सध्या प्रयोग सुरु असून काही युजरनाच ते वापरण्य़ास मिळणार आहेत. हे नवे स्टीकर सर्वात आधी तुम्हालाही मिळू शकतात. पण यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे.
हे नवे स्टीकर मिळवायचे असतील तर त्यासाठी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे. अँड्रॉईडसाठी बीटा 2.18.329 आणि अॅपलसाठी 2.18.100 हे व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यामध्ये नवे स्टीकर मिळण्याबरोबरच स्टीकर स्टोअरही देण्यात आले आहे. याद्वारे हवे असलेले स्टीकर पॅक डाऊनलोड करता येणार आहे. हे स्टीकर पॅक व्हॉट्सअॅप वेबवरही वापरता येणार आहे.
स्टीकर पॅक डाऊनलोड करण्यासाठी All Stickers या टॅबवर जावे लागेल. यानंतर डाऊनलोड बटनावर क्लीक करावे लागेल. My Stickers टॅबमध्ये हे डाऊनलोड केलेले स्टीकर पाहता येतील. आणखी स्टीकर हवे असतील तर Get More Stickers वर क्लीक करावे. व्हॉट्सअॅप वेबवर स्टीकर दिसत नसतील तर ब्राऊजरचा कॅचे डिलीट करावा आणि वेबपेज पुन्हा रिलोड करावे लागेल.
चॅटमध्ये स्टीकरचा वापर करायचा असेल तर चॅट बारमध्ये दिसणाऱ्या इमोजी बटनावर क्लीक करावे लागेल. यानंतर स्टीकरचा आयकॉन दिसेल. याशिवाय हिस्ट्री टॅबही दिसेल. याठिकाणी पूर्वी वापरलेले इमोजी दिसतील. फेव्हरेट टॅबमध्ये ठेवण्यासाठी स्टीकर निवडल्यावर स्टार आयकॉनवर क्लीक करावे लागणार आहे.
कसे कराल बीटा इन्स्टॉल?स्टीकर पॅक वापरण्यासाठी गुगल प्ले बीटा प्रोग्रॅम किंवा एपीके मिरर साईटमवरून एपीके फाईल डाऊनलोड करावे लागणार आहे.