Whatsapp वर नववर्षाचं दमदार स्वागत, 24 तासांत 100 अब्ज मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 12:07 PM2020-01-04T12:07:56+5:302020-01-04T12:18:35+5:30

सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजनी धुमाकूळ घातला.

new years eve record breaking 100 billion messages on whatsapp | Whatsapp वर नववर्षाचं दमदार स्वागत, 24 तासांत 100 अब्ज मेसेज

Whatsapp वर नववर्षाचं दमदार स्वागत, 24 तासांत 100 अब्ज मेसेज

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजनी धुमाकूळ घातला. नववर्षात व्हॉट्सअ‍ॅपने रेकॉर्ड केला आहे.फक्त 24 तासांत 100 अब्ज मेसेज करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली - सरत्या वर्षाला आनंदात निरोप देत मोठ्या दणक्यात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजनी धुमाकूळ घातला होता. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर हा केला जातो. नववर्षात व्हॉट्सअ‍ॅपने रेकॉर्ड केला आहे. फक्त 24 तासांत 100 अब्ज मेसेज करण्यात आले आहेत. 

वाढदिवस, सण आणि इतर अनेक कारणांसाठी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने असाच उत्साह पाहायला मिळाला. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजचा महापूरच आला. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे तब्बल 100 अब्ज मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील 20 अब्ज मेसेज हे फक्त भारतीयांनी पाठवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजसोबतच नववर्षाचं स्वागत करणारे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर वर्षभरात टेक्स्ट मेसेज, स्टेट्स, पिक्चर मेसेज, कॉलिंग आणि व्हॉईस नोट्स या फीचर्सचा सर्वाधिक वापर झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.  Happy New Year लिहिलेले लाखो मेसेज हे 31 डिसेंबर रोजी एकमेकांना शेअर करण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅपही युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. नववर्षातही व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी काही खास फीचर्स आणणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे. 

whatsapp is banning groups with malicious names and all its members | ...म्हणून WhatsApp करतंय युजर्सना बॅन

चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, आता एकाच वेळी अनेक ठिकाणी WhatsApp चालणार 

WhatsApp वरही घेता येणार Netflix वरच्या व्हिडीओची मजा

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही व्हॉट्सअ‍ॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक फीचर आलं होतं. यामध्ये YouTube चे व्हिडीओ हे व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दिसत होते. Picture in Picture मोडच्या माध्यमातून YouTube व्हिडीओ हा एका फ्लोटिंग विंडोमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये प्ले होतो. अशाच पद्धतीने Netflix वरचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.

 

Web Title: new years eve record breaking 100 billion messages on whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.