जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रॅन्ड Nike फुटवेअरच्या विश्वात नवीन क्रांति करणार आहे. Nike ने आता बाजारात आणलेला शूज हा स्मार्टफोनसोबत अटॅच असेल. इतकेच नाही तर या खास शूजमध्ये आणखीही खास गोष्टी आहेत. त्या जाणून घेऊ....
Nike कंपनीने या शूजची माहिती देणारा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या शूजला कंपनीने Nike Adapt BB असं नाव दिलं आहे. या स्मार्ट शूजला अॅपच्या माध्यमातून कंट्रोल केलं जाईल. त्याला टाइट किंवा सैल एका अॅपच्या माध्यमातून केलं जाणार आहे.
Nike चा शूज पायात टाकताच आपोआप अॅडजस्ट होईल. यातील सेंसर्स याला ऑटोमॅटिक फिटिंगच्या मोडवर ठेवतील. तसेच या शूजमध्ये जास्त फोर्स झेलण्याचीही क्षमता आहे.
खासकरुन हा शूज बास्केट बॉल खेळाडूंसाठी तयार करण्यात आला आहे. याचं कारण हा खेळ खेळताना-धावताना त्यांचे शूज पायातून निसटतात. त्यामुळे त्यांना खेळण्यात अडचण जाते. पण हे स्मार्ट शूज साइजनुसार अॅडजस्ट होतात. याने खेळाडूंना चांगलीच मदत होईल.
Nike Adapt BB या शूजची किंमत ३५० डॉलर इतकी आहे. भारतीय करन्सीमध्ये ही किंमत २५ हजार रुपये इतकी होते.