Nokia G20 स्मार्टफोन आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे आहे. हा स्मार्टफोनAmazon आणि Nokia.com वरून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला 7 जुलै रोजी भारतात लाँच झाला होता. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर 5050mAh ची बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असे दमदार फीचर्स आहेत. (Nokia G20 Goes On Sale Via Amazon, Nokia Site)
Nokia G20 ची किंमत आणि ऑफर्स
Nokia G20 मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु इंट्रोडक्टरी ऑफरअंतर्गत Nokia G20 च्या खरेदीवर 500 रुपयांची सूट देण्यात येत आहे. तसेच, या स्मार्टफोन सोबत Nokia Power Earbuds Lite विकत घेतल्यास अतिरिक्त 2,099 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ही ऑफर स्टॉक शिल्लक असे पर्यंत वैध असेल, असे कंपनीने सांगितले आहे.
Nokia G20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia G20 स्मार्टफोन 20:9 अस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 11 फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 512GB पर्यंत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे.
Nokia G20 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या नोकिया स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,050एमएएच बॅटरी मिळते.