गुगलप्रमाणे आता Whatsapp वरही हवं ते सर्च करा; कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 11:34 AM2019-10-05T11:34:45+5:302019-10-05T11:36:54+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे.

now you can use whatsapp as google search engine know how to use | गुगलप्रमाणे आता Whatsapp वरही हवं ते सर्च करा; कसं ते जाणून घ्या

गुगलप्रमाणे आता Whatsapp वरही हवं ते सर्च करा; कसं ते जाणून घ्या

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे.युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बोटच्या माध्यमातून हे अ‍ॅप सर्च इंजिनमध्ये बदलू शकतात. कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी युजर्सना ग्रुपमध्ये SEARCHTERM असं टाईप करावं लागणार

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे.  व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅप  युजर्सनाही गोष्टी सर्च करता येणार आहे. 

युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बोटच्या (Whatsapp Bot) माध्यमातून हे अ‍ॅप सर्च इंजिनमध्ये बदलू शकतात. या फीचरच्या मदतीने युजर्स खेळ, मनोरंजन, टेक, बातम्या यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी सर्च करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप गुगल सर्च इंजिनमध्ये बदलण्यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. बॉट Duta.in हे संगणक अथवा लॅपटॉपवर ओपन करा. युजर्सना या साईटवर व्हर्चुअल असिस्टंटसारखे फीचर्स मिळतील ज्याच्या माध्यमातून युजर्सना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. मात्र यासाठी सर्वप्रथम बॉट अ‍ॅक्टिवेट करणं गरजेच आहे. 

फीचर अ‍ॅक्टिवेट करण्यासाठी युजर्सना आपल्या फोनमध्ये +91-7397682861 हा नंबर व्हॉट्सअ‍ॅप बॉट या नावाने सेव्ह करावा लागणार आहे. तसेच एक ग्रुप अ‍ॅक्टिवेट करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तसेच युजर्स या ग्रुपमध्ये आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना अ‍ॅड करू शकतात. कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी युजर्सना ग्रुपमध्ये SEARCHTERM असं टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर युजर्सना हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. 

these 3 new features are coming on whatsapp it is special for android ios and web users | खूशखबर! Whatsapp वर लवकरच येणार

काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

WhatsApp कमाल करणार; चॅट आपोआपच गायब होणार

व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरवर लक्ष ठेवणारी साईट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅप एका अशा भन्नाट फिचरवर काम करत आहे की, पाठविलेला मॅसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डिसअ‍ॅपीअर्ड हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. हे फीचर आधीपासूनच टेलिग्राम अ‍ॅपवर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या पाठविलेले मेसेज पाठवणाऱ्याकडून डिलीट करता येतात. यावेळी मेसेज डिलिटेड असे दिसते. परंतू नव्या फिचरमध्ये हे दिसणार नाही. टाईम एक्स्पायर असे दिसण्याची शक्यता आहे.

Be! Now you can share whatsapp status on Facebook | व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

Whatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज

व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवण्यात येणारे स्टेटस आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटस आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. त्यामुळे या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकशी लिंक करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डिलीट करण्यात आल्यानंतर मात्र फेसबुकवर शेअर केलेले स्टेटस डिलीट होणार नसून फेसबुकवर कायम राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सुरुवातीला हे नवीन फीचर फक्त बीटी व्हर्जन युजरसाठी उपलब्ध करण्यात आले होते, मात्र आता सर्व फोनमध्ये हे नवीन फीचर वापरता येणार आहे. तसेच  व्हॉट्सअ‍ॅपवरून फेसबुकवर शेअर केलेल्या स्टेटसमध्ये केवळ फोटो किंवा पिक्चर टेक्स्टचं दिसू शकणार आहे.

 

Web Title: now you can use whatsapp as google search engine know how to use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.