पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा मालिकेत ए ३ आणि ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे ११,२९० आणि १२,७९० रूपये मूल्यात सादर केले आहेत.आगामी सणांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात होणार्या खरेदीच्या पार्श्वभूमिवर, विविध स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आपले मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतारत आहेत. या अनुषंगाने पॅनासोनिक कंपनीने एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. नावातच नमूद असल्यानुसार हे एल्युगा मालिकेतील मॉडेल्स आहेत. यात प्रोसेसर आणि स्टोअरेज वगळता सर्व फिचर्स समान आहेत.पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ या मॉडेलमध्ये क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर असून ए ३ प्रो या मॉडेलमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटी६७५३ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. अर्थात दुसर्या मॉडेलमधील प्रोसेसर हा तुलनेत अधिक गतीमान असेल. तसेच पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ या मॉडेलचे इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी तर ए३ प्रो या मॉडेलचे स्टोअरेज ३२ जीबी इतके असेल. अर्थात दोन्ही मॉडेल्सची रॅम तीन जीबी आहे. तर मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दोन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. या दोन बाबी वगळता पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो या दोन्ही स्मार्टफोन मधील सर्व फिचर्स समान आहेत.पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो या दोन्ही मॉडेलमध्ये पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा असेल. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा प्रदान करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती मल्टी-टास्कींग आणि दीर्घ काळच्या बॅकअपसाठी उपयुक्त ठरणारी असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय आदी पर्याय आहेत. तर उर्वरीत फिचर्समध्ये जीपीएस, मायक्रो-युएसबी २.०, फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीजी, ड्युअल सीम आदींचा समावेश आहे. पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या अर्बो या व्हर्च्युअल असिस्टंटने युक्त आहेत. अलीकडच्या काळात सॅमसंग, अॅपल आदी कंपन्यांच्या फ्लॅगशीप मॉडेलमध्ये त्यांचे व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आले आहेत. मात्र पॅनासोनिकने तुलनेत किफायतशीर मूल्य असणार्या स्मार्टफोनमध्येही ही सुविधा प्रदान केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो स्मार्टफोन
By shekhar.dhongade | Published: August 10, 2017 2:50 PM