Flipkart Big Billion Days 2021 Sale: या Poco स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:21 PM2021-10-02T13:21:39+5:302021-10-02T13:21:53+5:30
Flipkart Big Billion Days 2021 Sale:आजपासून Flipkart Big Billion Days सेलची सुरुवात Flipkart Plus मेम्बर्ससाठी करण्यात आली आहे. यात पोकोच्या अनेक स्मार्टफोन्सवर डील्स आणि ऑफर्स मिळत आहेत.
नुकताच पोकोने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Poco C31 सादर केला होता. आता या स्मार्टफोनसह Poco X3 Pro, Poco M2 Pro आणि Poco F3 GT हे स्मार्टफोन फ्लिपकार्ट Big Billion Days सेलमध्ये डिस्काउंटसह विकत घेता येतील. पोको स्मार्टफोन मॉडेल्सवर 2,000 रुपयांपर्यंतची सूट आणि बँक ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे.
Poco M2 Pro चे टन व्हेरिएंट 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळेल. या फोनचा 4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपये, 6GB/64GB स्टोरेज मॉडेल 12,999 रुपये आणि 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक 1,200 रुपयांच्या बँक ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात.
लोकप्रिय Poco X3 Pro स्मार्टफोनवर कंपनीने 2,000 रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2,000 रुपयांच्या बँक ऑफर्सची घोषणा देखील करण्यात आली आहे.
कंपनीचा बजेट फोन Poco M2 Reloaded स्मार्टफोन 1,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत 900 रुपयांपर्यंतची सूट बँक ऑफर्समधून मिळवता येईल. लेस्टस्ट Poco C31 स्मार्टफोन देखील 500 रुपयांच्या डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. त्यामुळे फोनच्या 3GB RAM + 32GB स्टोरेजसाठी 7,999 रुपये आणि 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 8,999 रुपये द्यावे लागतील.
गेमिंग फोन पोको एफ3 जीटीवर 1,500 रुपयांच्या बँक ऑफर्स मिळतील. तसेच Poco M3 आणि Poco M3 Pro 5G वर देखील कंपनीने कोणतीही सूट दिली नाही, परंतु बँक ऑफर्स उपलब्ध आहेत.