रियलमीने ऑगस्टच्या सुरुवातीला भारतात MagDart Magnetic Wireless Charger लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. ही नवीन वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी Apple च्या MagSafe प्रमाणे चुंबकांच्या मदतीने फोनच्या मागे चिटकून राहू शकते. पुढल्या आठवड्यात रियलमी MagDart वायरलेस चार्जरसह Realme Flash फोन देखील लाँच केला जाऊ शकतो. Realme TechLife ने आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे कि हा मॅग्नेटिक वायरलेस चार्जर 3 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता लाँच केला जाईल. (Realme MagDart Magnetic Wireless Charger Launch)
MagDart चार्जिंग टेक्नॉलॉजी
Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. GSMArena ने दिलेल्या माहितीनुसार, रियलमीचा MagDart चार्जर फोनच्या रियर पॅनलवर MagSafe चार्जरप्रमाणे चुंबकाच्या मदतीने चिटकून राहील. मोठ्या MagDart चार्जरमध्ये गर्मी कमी व्हावी म्हणून फॅन देखील देण्यात आला आहे. या MagDart चार्जरचा चार्जिंग स्पीड 15W असू शकतो.
Realme Flash चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme Flash चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. लीकनुसार, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि 12GB रॅमसह सादर केला जाईल. रियलमीचा हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालेल. या फोनमध्ये 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. Realme Flash ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.