11GB च्या दमदार रॅमसह स्वस्त Realme Narzo 50 लाँच; शाओमीला देणार का टक्कर?
By सिद्धेश जाधव | Published: February 24, 2022 03:15 PM2022-02-24T15:15:56+5:302022-02-24T15:17:20+5:30
Realme Narzo 50 India Launch: 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 11GB रॅम असलेला Realme Narzo 50 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.
Realme Narzo 50 4G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 11GB RAM असे स्पेक्स मिळतात. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत देखील बजेटमध्ये ठेवली आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G96 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Realme Narzo 50 चे स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 50 4G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा पंच-होल डिजाइन असलेला FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो. सोबत 6GB फिजिकल आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल RAM सपोर्ट मिळतो. तसेच 128GB पर्यंतची इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
बेसिक कनेक्टिव्हिटी फीचरसह साइड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा पोर्ट्रेट सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. Narzo 50 मध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W डार्ट फास्ट चार्जिंगसह मिळते.
Realme Narzo 50 4G Price in India
Realme Narzo 50 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन स्पीड ब्लू आणि स्पीड ब्लॅक कलरमध्ये 3 मार्चपासून खरेदी करता येईल.
हे देखील वाचा:
- तुमची मुलं ऑनलाईन काय करतात? Google ठेवणार तुमच्या मुलांना इंटरनेटवरील ‘घाणी’ पासून दूर
- मोठा डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि पावरफुल प्रोसेसर; Black Shark 4 Pro शी कोणीही घेणार नाही पंगा
- Flipkart Sale: उरले फक्त काही दिवस! फक्त 800 रुपयांमध्ये 3D साऊंड असलेला ‘हा’ शानदार Smart TV घेऊन या घरी