7100mAh बॅटरीसह Realme Pad होणार भारतात सादर; 9 सप्टेंबरला लाँच इव्हेंटचे आयोजन  

By सिद्धेश जाधव | Published: September 8, 2021 06:42 PM2021-09-08T18:42:49+5:302021-09-08T18:44:01+5:30

Realme Pad India Launch: Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी ट्वीटरवर आगामी रियलमी टॅबलेटचा फोटो शेयर केला आहे. सेठ यांनी सांगितले आहे कि या टॅबलेटचा युआय खूप सोप्पा बनवण्यात आला आहे.

Realme pad specifications leaked ahead of launch  | 7100mAh बॅटरीसह Realme Pad होणार भारतात सादर; 9 सप्टेंबरला लाँच इव्हेंटचे आयोजन  

7100mAh बॅटरीसह Realme Pad होणार भारतात सादर; 9 सप्टेंबरला लाँच इव्हेंटचे आयोजन  

Next

रियलमीचा पहिला वाहिला टॅबलेट Realme Pad भारतात 9 सप्टेंबरला लाँच होणार आहे. लाँचच्या होण्याआधी कंपनीने आपल्या सोशल मीडियावरून या टॅबलेटच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. रियलमीने आतापर्यंत रियलमी पॅडच्या प्रोसेसर, बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची माहिती शेयर केली आहे. रियलमी पॅड 9 सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमधून Realme 8s 5G आणि Realme 8i या स्मार्टफोनसह बाजारात दाखल होईल.  

Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी ट्वीटरवर आगामी रियलमी टॅबलेटचा फोटो शेयर केला आहे. सेठ यांनी सांगितले आहे कि या टॅबलेटचा युआय खूप सोप्पा बनवण्यात आला आहे. वजनाने हलका असल्यामुळे हा टॅबलेट कुठेही सहज नेता येईल. Realme Pad, Realme 8s 5G आणि Realme 8i स्मार्टफोन 9 सप्टेंबरला लाँच करण्यात येतील. हा लाँच इव्हेंट दुपारी 12.30 वाजता सुरु होईल आणि कंपनीच्या वेबसाईटवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघता येईल. 

Realme Pad चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Pad लाँच होण्याआधी Flipkart वर लिस्ट करण्यात आला आहे. या पेजनुसार Realme Pad ची जाडी 6.9mm आहे. तसेच यात 10.4-इंचाचा फुलस्क्रीन WUXGA+ डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2,000×1,200 पिक्सल आहे. Realme Pad मध्ये फ्रंट आणि बॅकला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात येईल. Realme Pad टॅबलेटमध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएन्ट लाइट सेन्सर आणि प्रोसिमिटी सेन्सर दिला जाईल. 

Realme Pad टॅबलेटमध्ये प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G80 SoC देण्यात येईल. Realme Pad टॅबलेटमध्ये 7,100mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 65 दिवसांचा स्टँडबाय टाइम देईल, असा दावा कंपनीने केला आहे. रियलमी टॅबलेटमधील बॅटरी 18W क्विक चार्ज टेक्नॉलॉजी सपोर्टसह सादर करण्यात येईल.  

Web Title: Realme pad specifications leaked ahead of launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.